GoodNews! सणा-सुदीच्या तोंडावर सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या किंमत

तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा सोने ५० हजाराच्या खाली

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दराने उच्चांक गाठल्याचे दिसत होते. मात्र साधारण तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा सोने ५० हजाराच्या खाली आले आहे. एमसीएक्सवर डिसेंबरमधील सोन्याचा दर ०.१५ टक्क्यांनी कमी होऊन ४९ हजार ९७१ रूपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. कोरोनाच्या काळात काहीशा कोलमडलेल्या भारतीय ज्वेलरी मार्केटला पुन्हा एकदा सावरायला सणा-सुदीच्या दिवसांची उत्सुकता आहे.

काही भागात सोन्याची मागणी पुन्हा वाढताना दिसत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, ८ ऑक्टोबर २०२० रोजी दिल्ली बुलियन मार्केटमधील २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,३५७ रुपये होती, तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,१२७ रुपये होती. तर बुधवारी २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,२८७ आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,०६३ रुपये होती.

चांदीचे दर गुरुवारी एमसीएक्सवरील चांदीचा दर ०.२३ टक्क्यांनी घसरून ६०,२८० रुपये प्रति किलो झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे व्यवहार होत आहेत. मात्र चांदीची किंमत उच्च स्तरावरून घसरल्याचे दिसत आहे. दरम्यान अमेरिकेत दर अनिश्चिततेमुळे या किंमतींवर दबाव आहे. परंतु डॉलरला खालच्या स्तरावर ही परिस्थिती उत्तम बघायला मिळत आहे. कॉमेक्सवर सोने १,९०० डॉलरच्या खाली आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेच्या निवडणुकांपूर्वी सोन्याच्या दरात घसरण राहण्याची शक्यता आहे.

सोन्याचे दर २०२० वर्षांच्यापूर्वी ८ महिन्यांत ३० टक्के वाढला आहे. परंतु, सप्टेंबरमध्ये डॉलरच्या वाढत्या किमती कमी झाल्या आहेत. परंतु सणांच्या हंगामात भारतातील सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. कारण भारतात सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी केली जाते. अशा स्थितीत गोल्ड मार्केटला दिवाळी-धनतेरसची प्रतीक्षा आहे.


जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ, सर्वसामान्यांचे बजेट कोलमंडले