लॉकडाउनमध्ये आजोबांचा घराबाहेर पडण्याचा हट्ट, नातवाने कंटाळून आजोबांचे हात पाय बांधले अन् तोंडाला चिकटपट्टी लावून नाल्यात फेकले

आजोबांनी नातवाची पोलिसांत तक्रार केली होती हाच राग मनात ठेवून नातवाने आजोबांचा खून केला.

grandson Killed his Grandfather at Nashik
लॉकडाऊनमध्ये आजोबांचा घराबाहेर पडण्याचा हट्ट, नातवाने कंटाळून आजोबांचे हात पाय बांधले अन् तोंडाला चिकटपट्टी लावून नाल्यात फेकले

लॉकडाउनच्या काळात घराबाहेर जाऊ न दिल्याने आजोबांनी आपल्या नातवाची पोलिसात तक्रार केली. हाच राग मनात ठेवून नातवाने आजोबांना जिवे मारल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. आजोबांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून त्यांचे दोन्ही पाय लोखंडी साखळीने बांधून नातवाने आजोबांना नाल्यात फेकून दिले.

नाशिकमधील गिरणारे येथील धोंडेगावात आजोबा आणि त्यांचा नातू राहत होते. रघुनाथ श्रावण बेंडकुळे असं मृत आजोबांच नाव आहे. ते ७० वर्षांचे होते. वयोमानानुसार आजोबांचे मानसिक संतुलन ढासळले होते. लॉकडाऊनच्या काळात ते सतत घराबाहेर जाण्याचा हट्ट करायचे. बाहेरिल परिस्थिती पाहता त्यांचा नातू किरण याने त्यांना घराबाहेर जाण्यास सक्त मनाई केली होती. तरिही आजोबा विनाकारण घराबाहेर किंवा मंदिरात जात होते. यावरून आजोबा आणि नातू यांच्यात बऱ्याच वेळा भांडणही झाली होती.

आजोबांनी आपलं मानसिक संतुलन हरवले होते. नातवासोबत रोज होणाऱ्या भांडणांमुळे शेवटी आजोबांनी नातवाविरूद्ध पोलिसांत तक्रार केली.नातू आपल्याला घराबाहेर जाण्यापासून अडवतो असं गाऱ्हाणं आजोबांनी पोलिसांना सांगितले. याचाच राग मनात ठेवून नातवाने आपल्या वृद्ध आजोबांना नाल्यात फेकले. रात्री उशिरा आजोबांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यांचे दोन्ही हात पाय लोखंडी साखळीने बांधून त्यांना गावातलगत असलेल्या ओढ्यात फेकून दिले.

दुसऱ्या दिवशी ओढ्याच्या किनाऱ्यावर आजोबांचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर हा खूनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला. घटनास्थळी दाखल असलेल्या व्यक्तीपैकी एकाने आजोबांची ओळख पटवली. त्यांच्या नातवानेच यांचा खुन केला असावा असं सांगण्यात आलं. त्यानुसार पोलिसांनी नातवाला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. त्यानंतर आपणच आजोबांचा खून केला असल्याचं नातवाने कबूल केलं.


हेहि वाचा – मृत अर्भकावरून प्रकरण उघडकीस; जन्मदात्याकडून अल्पवयीन राहिली होती गर्भवती