घरटेक-वेकदीड लाख किंमतीच्या 'या' फोनची केवळ अर्ध्या तासात विक्री!

दीड लाख किंमतीच्या ‘या’ फोनची केवळ अर्ध्या तासात विक्री!

Subscribe

ग्राहकांना २० ऑक्टोबर पर्यंत फोन मिळणार आहेत. यामुळे लक्झरी स्मार्टफोन कॅटेगरीत सॅमसंगने एक नवा विक्रम रचला आहे.

सॅमसंगने लक्झरी स्मार्टफोनच्या कॅटेगरीत सॅमसंग गॅलक्सी फोल्ड नावाचा फोन आणला आहे. विशेष म्हणजे या फोनची किंमत १,६४,९९९ रुपये एवढी आहे. असे असूनही सॅमसंगच्या या फोनची केवळ अर्ध्या तासात विक्री झाली आहे. या स्मार्टफोनच्या प्री-बुकिंगसाठी ग्राहकांना फोनची संपूर्ण किंमत आगाऊ भरायची होती. ग्राहकांना २० ऑक्टोबर पर्यंत फोन मिळणार आहेत. यामुळे लक्झरी स्मार्टफोन कॅटेगरीत सॅमसंगने एक नवा विक्रम रचला आहे.

सॅमसंग गॅलक्सी फोल्ड खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना एका डेडिकेडेट हेल्पलाइन क्रमांकाचा (1800 20 7267864) अॅक्सेस मिळेल. या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास ग्राहकांना तज्ज्ञाचा सल्ला मिळेल. याव्यतिरिक्त कंपनी ग्राहकांना एक वर्षाचा अपघाती विमा कवर वन टाइम प्रोटेक्शनसह देणार आहे. गॅलेक्सी फोल्डच्या फ्लेक्स डिस्प्लेवर हे संरक्षण ग्राहकांना मिळेल. यामध्ये अॅक्सिडेंटली डिव्हाइसचा डिस्प्ले डॅमेज झाल्यास १०,५०० रुपयांच्या सवलतीच्या दरात ग्राहकांना डिव्हाइसचा डिस्प्ले रिप्लेस करता येणार आहे.

सॅमसंग गॅलक्सी फोल्डची वैशिष्ट्यं

  • Samsung galaxy Fold फोनचा फ्रंट डिस्प्ले ४.६ इंचाचा आहे. यात ८४०x१९६० पिक्सल रिझोल्यूशन आणि सुपर AMOLED डिस्प्ले. त्याचा आस्पेक्ट रेशियो २१:९ आहे.
  • फोनमधील दुसरा डिस्प्ले ७.३ इंचाचा आहे. हा डिस्प्ले इनफिनिटी फ्लेक्स डायनॅमिक AMOLED पॅनल वाला आहे. ४.२:३ आस्पेक्ट येणारं डिस्प्ले पॅनलचं रिझोल्यूशन QXGA म्हणजेच १५२६x२१५२ पिक्सल आहे.
  • फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि १२ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आहे. फोनचा तिसरा कॅमरा १२ मेगापिक्सलचा आहे. जो टर्शिअरी सेंसरसोबत येतो.
  • फोनच्या फ्रंटला १० मेगापिक्सल + ८ मेगापिक्सचा ड्युअल कॅमरा सेटअप आहे. इतकेच नव्हे तर फोनच्या कव्हरवरदेखील १० मेगापिक्सलचा एक कॅमेरा सेंसर आहे. १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबीच्या इंटरनल स्टोरेजसह येणारा हा फोन माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट करत नाही.
  • फोनमध्ये ऑक्टा-कोर एसओसी प्रोसेसर दिलं आहे. ऑपरेटिंग सिस्टम बद्दल सांगायचं तर हा फोन अँड्रॉइड ९ वर आधारित सॅमसंगच्या One UI वर काम करतो. फोनमध्ये 4,380mAh ची बॅटरी आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -