कोरोनामुळे ३८२ डॉक्टरांचा मृत्यू; केंद्राने शहीदाचा दर्जा द्यावा – IMA

382 doctors died due to corona virus

केंद्र सरकारने संसदेमधअये कोरोनामुळे आतापर्यंत किती डॉक्टरांना, स्टाफला कोरोनाचा संसर्ग झाला आणि आताप्रयंत किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती नसल्याचं सांगितलं. यावर आता इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने एक प्रसिध्दी पत्रक जारी करत सडकून टीका केली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ज्या डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव गमावला आहे त्या शहीद म्हणून घोषित कराव, अशी मागणी असोशिएशने केली आहे.

असोसिएशनने आपल्या प्रसिद्ध पत्रात म्हटलं आहे की, “किती डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, किती जणांनी बलिदान दिलं आहे, याचा डेटा केंद्र सरकार ठेवत नसेल तर साथीचा रोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.” एकीकडे त्यांना कोरोना वॉरियर्स म्हणायचं आणि त्यांना हुतात्मा म्हणण्यास, त्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्यास नकार दिला जात आहे. यावरुन यांचा ढोंगीपणा देखील उघडकीस आल्याचं असोशिएशने म्हटलं आहे. पुढे पत्रात म्हटलं आहे की, “सीमेवर लढा देणारे आपले शूर सैनिक आपला जीव धोक्यात घालतात आणि शत्रूशी लढा देतात, पण कुणीही गोळी घरी आणत नाही आणि ती आपल्या कुटूंबरोबर सामायिक करत नाही. परंतु डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचारी राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करतात. यावेळी केवळ त्यांनाच संसर्ग होत नाही, तर ते जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांच्या कुटुंबाला आणि मुलांना देखील कोरोनाचा संसर्ग होतो.”

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे म्हणाले की सार्वजनिक आरोग्य आणि खासगी रुग्णालये राज्यांत येतात, त्यामुळे विमा भरपाईचा डेटा केंद्र सरकारकडे नाही. हा या संकटात देशासोबत उभ्या राहिलेल्या नायकांचा अपमान आहे, असं इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं आहे. असोसिएशनने ३८२ डॉक्टरांची यादी जाहीर केली ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आयएमएच्या या चार प्रमुख मागण्या आहेत

१. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांना शासनाने शहीद दर्जा द्यावा
२. केंद्र सरकारने त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन व नुकसान भरपाई द्यावी.
३. सरकारी परिचारिका व इतर आरोग्य सेवा कर्मचारी प्रतिनिधींकडूनही असा डेटा घ्यावा.
४. पंतप्रधानांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बोलावून आमचे प्रश्न जाणून घ्या आणि सूचना ऐकाव्यात.


हेही वाचा – केंद्राचे दावे-वादे खूप; मात्र कोरोना पुढे, देश मागेच – शिवसेना