घरदेश-विदेशदिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा; आपने पंतप्रधानांना पाठवले १० लाख पत्र

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा; आपने पंतप्रधानांना पाठवले १० लाख पत्र

Subscribe

दिल्लीतील जनतेला आपल्याच राज्यात केंद्र सरकारकडू सावत्र वागणुक मिळत असल्याने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी आपने मागणी केली आहे. यासाठी आपने राबवलेल्या स्वाक्षरी मोहीमेमधून आलेले १० लाख पत्र आपच्या आमदारांनी पंतप्रधानांना पाठवले.

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख पत्र पाठवले आहेत. आपने या मागणीला दिल्लीमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली होती. आज आपच्या आमदारांनी १० लाख पत्रांचा गट्टा पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे.

आपने राबवली स्वाक्षरी मोहीम

आम आदमी पार्टीचे दिल्लीच्या समन्वयक गोपाळ राय यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदारांनी पंतप्रधान कार्यालयाकडे जनतेने केलेल्या स्वाक्षरांची पत्र दिले आहे. याआधी पक्षाचे आमदार आणि इतर सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी एकत्र येऊन त्यांना या विषयावर जनतेचे म्हणणे सांगितले. त्यानंतर आपच्या सर्व आमदारांनी पत्र घेऊन पंतप्रधान कार्यालयात गेले.

“दिल्लीतील जनतेला आपल्याच राज्यामध्ये केंद्र सरकारची सावत्र वागणुकीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आम्ही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी जुलैपासून अभियान सुरु केले. या अभियानाअंतर्गत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संबोधित करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरु केली. यामध्ये १० लाखापेक्षा अधिक स्वाक्षरी आल्या.” – गोपाल राय, आपचे नेते

- Advertisement -

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा

जनतेने या पत्रांमध्ये दिल्लीतील जनतेच्या भावनांचा आदर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची विनंती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिल्लीच्या सात खासदारांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. गेल्या चार वर्षात केंद्राच्या भाजप सरकारने यासाठी अद्यापही काहीच पाऊल उचलले नाही. त्यामुळे दिल्लीच्या जनतेने हा पुढाकार घेत पंतप्रधानांकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -