घरदेश-विदेशज्युनिअर एनटीआरच्या वडिलांचा अपघाती मृत्यू

ज्युनिअर एनटीआरच्या वडिलांचा अपघाती मृत्यू

Subscribe

तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते नंदमुरी हरीकृष्णा यांच्या गाडीला बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या हरीकृष्णा यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते नंदमुरी हरीकृष्णा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी नंदमुरी यांच्या कारला भीषण अपघात झाला या अपघातामध्ये त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नंदमुरी हरिकृष्णा टीडीपीचे संस्थापक एनटी रामा राव यांचा मुलगा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे मेहूणे होते. हैद्राबादच्या कामिनेनी हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे तेलुगू चित्रपटसृष्टी आणि आंध्रप्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

- Advertisement -

भरधाव कार डिव्हायडरला धडकली

नालगोंडा जिल्ह्याच्या नारकेपल्ली-अदांकी महामार्गावर हा भीषण अपघात झाला. नंदमुरी हरिकृष्ण आंध्रप्रदेशच्या नल्लौर जिल्ह्यातील कावली येथे एका लग्न समारंभासाठी जात होते. दरम्यान नालगोंडा महामार्गावर त्यांची गाडी डिव्हायडरला धडकून पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या नंदमुरी हरिकृष्ण यांना ताबतोब उपचारासाठी कामिनेनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी

या भीषण अपघातामध्ये नंदमुरी हरिकृष्ण यांच्यासोबत गाडीमध्ये असलेले दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देखील हैद्राबादच्या कामिनेनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या नंदमुरी हरिकृष्ण यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. तसंच त्यांच्या शरिरामध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताचा तपास हैद्राबाद पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -