घरदेश-विदेशपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

Subscribe

जम्मू-कश्मीरच्या सुंदरबेनी सेक्टर येथे पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला, यामध्ये भारताचे जवान यश पॉल शहीद झाले आहेत.

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गोळीबार केला, तसेच लहान तोफांतून बॉम्बही फेकले आहेत. लष्कारातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुंदरबेनी सेक्टरच्या केरी बेल्ट येथे पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात भारतीय रायफलमन २४ वर्षीय यश पॉल शहीद झाले आहेत. यावर्षी जानेवारीपासून ते आतापर्यंत पाकिस्तानने ११० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहेत. यावेळी दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर बॉम्ब फेकल्यामुळे दोन पोलीस जखमी झाले आहेत. रायफलमन करमजीत सिंह हे गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. वर्ष २०१९ सुरु झाल्यापासून जवळपास रोज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. ही संख्या आता ११० वर पोहोचली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच नियंत्रण रेषेजवळ अखनूर आणि सुंदरबेनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये एक जवान शहीद तर चार जण गंभीर जखमी झाले होते. वर्ष २०१८ मध्ये सर्वात जास्त म्हणजेच २ हजार ९३६ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते. २००३ साली शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत झालेल्या कराराचे पाकिस्तानकडून सतत हनन होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -