घरदेश-विदेशप्रश्न विचारल्यावर भाजप नेत्याला आला राग; पायातील बूट काढून मारण्याचा प्रयत्न

प्रश्न विचारल्यावर भाजप नेत्याला आला राग; पायातील बूट काढून मारण्याचा प्रयत्न

Subscribe

उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या समस्येवर योगी सरकारने काय कामे केली? असा प्रश्न विचारला असता एक भाजप नेता भडकला. त्याने पायातील बूट काढून किसान युनियनच्या नेत्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी अडवल्यामुळे हा वाद निवळला.

उत्तर प्रदेशच्या सहारनपुर येथे एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान एका भाजप नेत्याने भारतीय किसान युनियनच्या नेत्यावर बूट उगारल्याची घटना घडली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते अरुण राणा यांनी विचारलेल्या प्रश्नाचा सहारनपुरचे भाजप जिल्हाध्यक्ष विजेंद्र कश्यप यांना राग आला. त्यांच्या डोक्याचा पार एवढा वाढला की, त्यांनी पायातील बूट काढून अरुण राणांवर उगारला. याशिवाय त्यांनी बूटाने मारण्याची धमकी दिली. दरम्यान तेथील आजूबाजूच्या लोकांनी अडवल्यामुळे हे प्रकरण निवाळले.

नेमकं काय आहे प्रकरण?

खरंतर सहारनपुर येथे एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. या कार्यक्रमामध्ये विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते. हा एक चर्चासत्राचा कार्यक्रम होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे ऊस उत्पादक शेतकरी योगी सरकारवर नाराज आहेत. शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलनही केलं आहे. याच पार्श्वभूमीवर अरुण राणा यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांचा कश्यप यांना राग आला आणि त्यांनी पायातील बूट काढून त्यांच्यावर उगारला. यासोबतच त्यांनी राणांवर शिवीगाळही केली. बूटाने मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर कश्यपवर टीका होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -