घरट्रेंडिंग३१ ऑक्टोबर रोजी Blue Moon चा दुर्मिळ योग!

३१ ऑक्टोबर रोजी Blue Moon चा दुर्मिळ योग!

Subscribe

३१ ऑक्टोबर रोजी रात्रीचे आकाश स्वच्छ राहणार असून या रात्री कोणालाही दुर्बिणीच्या सहाय्याने ब्लू मून पाहता येणार...

येत्या ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१९ वाजता ‘ब्लू मून’ पाहण्याचा दुर्मिळ योग येणार आहे. महिन्यातून एकदा होणारे पूर्ण चंद्राचे दर्शन ऑक्टोबर महिन्यात दोनदा होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला इंग्रजीत ‘ब्लू मून’ असे म्हटले जाते. एखाद्या दुर्मीळ प्रसंगाला इंग्रजीत ‘वन्स इन अ ब्लू मून’ असे म्हटले जाते. १७ व्या शतकात याचा पहिलांदा वापर करण्यात आला होता. दरवर्षी प्रत्येक महिन्याला एक असे वर्षाला १२ पुर्ण चंद्र दिसतात.

ब्लू मूनमुळे यंदा १३ पूर्ण चंद्र दिसणार आहे. यापूर्वी अशी घटना ३० जून २००७ रोजी घडली होती. त्यानंतर असा प्रसंग ३० सप्टेंबर २०५० रोजी येणार असल्याचे सांगितले जात आहे. २०१८ साली ३१ जानेवारी आणि ३१ मार्च अशा दोन दिवशी ‘ब्लू मून’ दिसले होते. पुढील ‘ब्लू मून’ ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दिसणार आहे. दरम्यान, चंद्र लालसर रंगाचा असतो. पण चंद्र जेव्हा क्षितिजापासून अधिक उंचीवर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तीत प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात करडय़ा छटा मिसळल्याने तो निळसर भासू लागतो. मात्र ‘ब्लू मून’च्या व्याख्येचा त्याच्या रंगाशी कोणताही संबंध नसल्याची माहिती आहे.

- Advertisement -

खगोलशास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, ३१ ऑक्टोबर रोजी रात्रीचे आकाश स्वच्छ राहणार असून या रात्री कोणालाही दुर्बिणीच्या सहाय्याने ब्लू मून पाहता येणार आहे. नेहरू तारांगणासह अनेक खगोलशास्त्रज्ञ या खगोलशास्त्रीय घटनेच्या साक्षीसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाश्चात्य देशांत ग्रीष्म, उन्हाळा, शरद, हिवाळा असे प्रत्येकी ३ महिन्यांचे चार ऋतू असतात. दर महिन्याला एक याप्रमाणे प्रत्येक ऋतूमध्ये तीन पूर्ण चंद्र दिसणे अपेक्षित आहे. ‘ब्लू मून’ ज्या ऋतूत दिसतो त्या ऋतूमध्ये त्या वर्षी तीनऐवजी चार पूर्ण चंद्र दिसतात. अशावेळी तिसऱ्या पूर्ण चंद्राला ‘ब्लू मून’ म्हटले जाते. फेब्रुवारी कमी कालावधीचा असल्याने ‘ब्लू मून’ कधीच दिसू शकत नाही. ३० दिवसांच्या महिन्यात ‘ब्लू मून’चे प्रमाण अत्यल्प असते.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक पूर्ण चंद्र वेगळ्या नावाने ओळखला जातो. प्रत्येक चंद्रमास २९ दिवस, १२ तास, ४४ मिनिटे, ३८ सेकं दे इतक्या कालावधीचा असतो. प्रत्येक सौरवर्ष ३६५ दिवस, ५ तास, १९ मिनिटे, ३० सेकं दे इतक्या कालावधीचे असते. यानुसार प्रत्येक सौरवर्षांत पूर्ण १२ चंद्र वर्षे असतात. शिवाय १० दिवस आणि २०.९ तास अधिकचे असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -