घरदेश-विदेशमहात्मा गांधीच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

महात्मा गांधीच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी उत्तरप्रदेशच्या अलीगढमध्ये ही घटना झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी १३ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांच्या प्रतिमेवर एअर पिस्तुलने गोळ्या झाडल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी प्रतिमेला गोळ्या झाडणाऱ्या हिंदु महासभेच्या महिला कार्यकर्त्यासह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करत दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी उत्तरप्रदेशच्या अलीगढमध्ये ही घटना झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी १३ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तर दोन जणांना अटक केली आहे. अभिषेक आणि मनोज या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही अखिल भारतीय हिंदू महासभेचे सदस्य आहेत. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

आरोपींचा शोध सुरु

याकारवाईबद्दल अलीगढचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक आकाश कुलहरी यांनी सांगितले आहे की, बुधवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नौरंगाबाद भागातील एका घरात हिंदू महासभाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला एअर पिस्तुलने गोळी झाडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू महासभेच्या महिला कार्यकर्त्या पुजा शकुन पांड्येसह १३ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरु केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहेत.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

३० जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७१ व्या पुण्यतिथीनिमित्त हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय घृणास्पद कृत्य केले. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या. तसेच त्यांच्या प्रतिमेचे दहनही केले. यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण करत मिठाईचे वापट करण्यात आले. ‘महात्मा नथुराम गोडसे अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. उत्तर प्रदेशातील अलीगड येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -