घरदेश-विदेशन्यूझीलंडच्या मशिदीत ५१ लोकांना मारणारा हल्लेखोर म्हणतो, 'मला पश्चाताप नाही'

न्यूझीलंडच्या मशिदीत ५१ लोकांना मारणारा हल्लेखोर म्हणतो, ‘मला पश्चाताप नाही’

Subscribe

न्यूझीलंडमध्ये १५ मार्च रोजी साऊथ आयलँडवरील ख्राइस्टचर्च शहरात दोन मशीदींमध्ये गोळीबार करण्यात आला होता. या घटनेमध्ये ५१ लोक मारले गेले होते. या घटनेतील आरोपी ऑस्ट्रेलियन नागरिक ब्रेटाँन टारंटला ख्राइस्टचर्च हायकोर्टात सादर करण्यात आले. त्याच्यावर ९२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ५१ लोकांची हत्या केल्याचाही गुन्हा आहे. मात्र आरोपी ब्रेटाँनने ५१ लोकांना मारल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे कोर्टात सांगितले आहे.

याआधी जेव्ह ऑकलंड येथे त्याला सुनावणीसाठी जेव्हा त्याला आणण्यात आले होते, तेव्हा तर तो चक्क हसत होता. ख्राइस्टचर्च हायकोर्टाचे न्यायाधीश कॅमेरॉन यांनी सांगितले की ब्रेटाँनची मानसिक स्थिती असून त्याच्यावरील सुनावणी चालू ठेवण्यात काहीच हरकत नाही. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी ४ मे रोजी होणार असल्याचे सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य आणि अवाका अधिक असल्यामुळे हा खटला आव्हानात्मक आहे. त्यामुळेच कोर्टाने एक वर्ष पुढची तारिख दिली आहे. एप्रिल महिन्यात ब्रेटाँनला पहिल्यांदा कोर्टात सादर केले होते, त्यानंतर त्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात आली होती.

- Advertisement -

आरोपी ब्रेटाँन हा २९ वर्षांचा आहे. ऑकलँड येथे जेव्हा त्याला कोर्टात आणण्यात आले तेव्हा त्याने आपल्या वकिलामार्फत केलेल्या गुन्ह्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे सांगितले. यावेळी कोर्टात ख्राइस्टचर्च मुस्लिम समुदायातील ८० सदस्य आणि माध्यमांचे प्रतिनिधी देखील जमले होते. तसेच या खटल्याची सुनावणी पाहण्यासाठी आलेल्या लोकांना बसायला जागा नसल्यामुळे दुसऱ्या खोलीत लाईव्ह प्रक्षेपण दाखवले गेले.

प्रकरण काय आहे?

ख्राइस्टचर्च शहरातील दोन मशिदीत १५ मार्च रोजी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. माथेफिरू आरोपी ब्रेटाँनने या गोळीबाराचे १७ मिनिटांचे फेसबुक लाईव्ह देखील केले होते. हे फुटेज आणखी पसरू नये, यासाठी न्यूझीलंड पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून ते डिलीट करण्यात आले. ब्रेंटन टॅरेंट हा ऑस्ट्रेलियन युवक असला तरी तो स्वतःला निओ-नाझीवादी समजतो. युरोपात इस्लामचा प्रभाव वाढला आहे. इस्लामच्या विरोधात शस्त्र घ्यायला हवेत, अशी त्याची विचारधारा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -