घरदेश-विदेशलॉकडाऊन फेल, राहुल गांधींनी शेअर केला स्पेन, जर्मनी, इटली आणि भारताचा आलेख

लॉकडाऊन फेल, राहुल गांधींनी शेअर केला स्पेन, जर्मनी, इटली आणि भारताचा आलेख

Subscribe

जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊन हटवताना कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर भारतात उलट चित्र आहे.

चीनच्या वूहान शहरातून पसरलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाटी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केला होता. भारतातही कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तब्बल ५५ दिवसांनी देश लॉकडाऊन केला. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. या काळात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले. आता लॉकडाऊनमध्ये शिथिल केला जात असून हा लॉकडाऊन फेल झाला आहे, असं काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि भारताचा आलेख शेअर करत लॉकडाऊन फेल झाल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

कोरोना जेव्हा इतर देशांमध्ये शिरकाव करत होता तेव्हा पासून कोरोना संदर्भात सूचना करत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आला. केंद्र सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयावरही त्यांनी सुरूवातीपासून केंद्राला काही सूचना केल्या होत्या. सरकारने चाचण्या वाढवाव्या अशी सूचना केली होती. केवळ लॉकडाऊनने काहीही होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते. केंद्र सरकारने लागू केलेला लॉकडाऊन पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका देखील त्यांनी केली होती. जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊन हटवताना कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर भारतात उलट चित्र आहे, असं ते म्हणाले होते. राहुल गांधी यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख ट्विट केला आहे. या आलेखांबरोबर राहुल गांधी यांनी “हे अपयशी झालेल्या लॉकडाऊनसारखं दिसत आहे,” असं म्हटलं आहे.


हेही वाचा – CoronaVirus: देशात सर्वाधिक ९ हजार ८८७ नव्या रुग्णांची नोंद; २९५ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -