घरदेश-विदेशइतिहासात प्रथमच काँग्रेसने गमावला अमेठी मतदारसंघ

इतिहासात प्रथमच काँग्रेसने गमावला अमेठी मतदारसंघ

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यातील अमेठीत राहुल गांधी यांनी गमावली असली तरी वायनाड या मतदारसंघात ते विक्रमी आघाडीवर आहेत. इतिहासात पहिल्यांदाच अमेठी मतदारसंघातून काँग्रेसचा पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या स्मृती इराणी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अमेठीला प्रेमाने सांभाळ, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले राहुल गांधी 

जे निकाल आले आहेत ते देशातील जनतेने दिलेला कौल आहे. त्याचा आम्ही सन्मान करतो. या निकालांचा स्विकारही करतो. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देतो. ही आमची वैचारिक लढाई होती. मी ही लढाई प्रेमाने लढली. तसेच यापुढेही मी प्रेमाने लढेन, असे राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले.

- Advertisement -

अमेठी गमावले पण वायनाड मिळवले 

वायनाडमध्ये राहुल गांधी हे चार लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीत वायनाड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवार एम. आय. शहनवास हे निवडून आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे निधन झाले. २००९ मध्ये काँग्रेसचा उमेदवार दीड लाखांनी विजयी झाला होता. २०१४ मध्ये शहनवास यांचे मताधिक्य २० हजारांपर्यंत घटले होते. वायनाड जिल्ह्यात हिंदू लोकसंख्या ही ४९ टक्क्यांच्या आसपास आहे. राहुल गांधी यांनी केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांशी जोडणारा दुवा म्हणूनच वायनाड मतदारसंघाची निवड केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -