घरदेश-विदेशबिहारमध्ये चमकी तापाने घेतला ६४ चिमुकल्यांचा बळी

बिहारमध्ये चमकी तापाने घेतला ६४ चिमुकल्यांचा बळी

Subscribe

बिहारच्या मुजफ्फरपूर आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये या तापाने अनेक चिमुरड्यांचा बळी घेतला आहे. मरणाऱ्यांची आणि उपचारासाठी येणाऱ्यांचे गर्दी सुरुच आहे.

बिहारमध्ये चमकी तापाने कहर केला आहे. या तापामुळे आतापर्यंत ६४ मुलांचा मृत्यू झाला आहे. या तापाला एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम असे म्हटले जाते. बिहारच्या मुजफ्फरपूर आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये या तापाने अनेक चिमुरड्यांचा बळी घेतला आहे. मरणाऱ्यांची आणि उपचारासाठी येणाऱ्यांचे गर्दी सुरुच आहे. आतापर्यंत या तापाने मुजफ्फरपूरमध्ये ६४ चिमुरड्यांचा बळी गेतला आहे. यामध्ये ४६ मुलांचा मृत्यू श्री कृष्णा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये झाला आहे. तर इतर मुलांचा मृत्यू हा केजरीवाल हॉस्पिटलमध्ये झाला आहे.

काय आहेत लक्षणं?

१५ वर्षापर्यंत वय असणाऱ्या मुलांना हा आजार होत आहे. मृत्यू होणाऱ्या मुलांचे वय १ ते ७ वर्षाच्या मध्ये आहे. या आजारामुळे मृत्यू होणारी मुलं ही गरीब कुटुंबातील आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजाराचे मुख्य लक्षण तापाने फणफणने, उल्टी होणे, जुलाब होणे, बेशुध्द पडणे, शरीरामध्ये चमका निघणे.

- Advertisement -

केंद्रीय टीमने दिली भेट

दरवर्षी या काळामध्ये मुजफ्फरपूरमध्ये या आजारामुळे अनेक मुलांचा मृत्यू होतो. मागच्या वर्षी गर्मी कमी असल्यामुळे या आजाराच प्रभाव कमी असल्याचे पहायला मिळाले होते. हा आजार झाल्यामुळे आतापर्यंत १६७ मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या आजाराचा हाहाकार पाहता केंद्रीय टीमने बुधवारी संध्याकाळी एसकेएमसीएच हॉस्पिटलला भेट दिली. विशेष तज्ज्ञ डॉक्टरांनी मुलांची तपासणी केली. तसंच स्थानिक डॉक्टरांसोबत या आजारवर आणि कराणांवर चर्चा केली.

यामगे लिची कनेक्शन ?

मुलांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी आतापर्यंत प्रतिक्रिया दिली नाही. पण असे सांगितले जाते की, यावर्षी बिहारमध्ये आतापर्यंत पाऊस झाला नाही. ज्यामुळे मृत्यूंचा आकडा वाढत चालला आहे. तसंच मुलांच्या आजाराच्या मागे ‘लीची कनेक्शन’ असल्याचे देखील म्हटले जात आहे. गेल्या १५ वर्षामध्ये याच्यावर रिसर्च करण्यात आला. मुजफ्फरपूरमध्ये उगवली जाणाऱ्या लीचीमुळेच हा आजार तर होत नाही असे देखील म्हटले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -