घरदेश-विदेशहत्या झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेतच पुरला

हत्या झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेतच पुरला

Subscribe

डेहराडून येथील एका बोर्डिंग शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलाची हत्या झाल्यानंतर त्याच्या मृतदेह पुरण्यात आला होता. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी मारहाण केल्यामुळे हा मृत्यू झाला होता.

वरिष्ठ विद्यार्थ्याने मारहाण केल्या प्रकरणी एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्यानंतर या मुलाचा मृतदेह शाळेच्या मैदानावरच पुरण्यात आला. वासू यादव असे या मयत मुलाचे नाव आहे. वासूला शुल्लक कारणावरून त्याच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी चोप दिला. क्रिकेट बॅटने वार केल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. घाबरून बोर्डिंग प्रशासनाने या मुलाचा मृतदेह या शाळेतच पुरला. या मुलाची हत्या झाली याबाबत त्यांनी पालकांना सांगितले नव्हते. मुलाचा फोन येत नसल्याने पोलीस तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी या मुलाचा शोध घेत खरा प्रकार समोर आणला. या प्रकरणी बोर्डिंगच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

काय आहे प्रकरण

डेहराडून येथे असलेल्या या बोर्डिंग शाळेत यादव मागील काही महिन्यांपासून शिकत होता. या बोर्डिंगमध्ये यादव आणि एका वरिष्ठ विद्यार्थ्याचा बिस्कीटावरून वाद झाला होता. या वादामुळे वरिष्ठ विद्यार्थ्याने त्याच्या क्रिकेटच्या बॅटेने मारले. क्रिकेटचा स्टम्प त्याच्या डोक्यात घालण्यात आला. बेदम मारहाण झाल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी घडली होती मात्र या मुलाला संध्याकाळी उशीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषत केले. यावेळी बोर्डिग प्रशासनाने घाबरून या मुलाचा मृतदेह शाळेतच पुरला होता. यानंतर मुलगा बोर्डिंग मधून पळून गेल्याचे कारण बोर्डिंग प्रशासन मुलाच्या पालकांना देणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -