१०० रुपयाच्या ड्रेसमुळे भावाने फोडले बहिणीचे डोळे

बहिणीने भावाला १०० रुपयाचा सूट घेतल्याने संतप्त झालेल्या भावाने बहिणीचे डोळे फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bihar
Delhi boy gouges out sister's eyes for buying dress worth Rs 100
बहिणीने घेतला १०० रुपयाचा ड्रेस आणि भावाने फोडले डोळे

रक्षाबंधन म्हणजे बहिणभावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हदय प्रेमाने जिंकून घेते. मात्र, या बंधनाच्या नात्याला काळीमाना फासणारी घटना दिल्लीमध्ये घडल्याचे समोर आले आहे. बहिणीने भावाला १०० रुपयांचा सूट आणल्यामुळे संतप्त भावाने बहिणीचे डोळे फोडल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. बहिणीने १०० रुपयांचा ड्रेस खरेदी केल्याने संतप्त झालेल्या भावाने बहिणीला मारहाण करत तिचे डोळे फोडले आहेत.

नेमके काय घडले?

दिल्ली येथील द्वारकाजवळ हे कुटुंब राहत असून हे मूळचे बिहारचे कुटुंब आहे. दिल्ली येथील द्वारकाजवळ राहणाऱ्या २० वर्षीय बहिणीने आपल्या भावासाठी १०० रुपयाचा सूट आणला होता. मात्र, आपल्या बहिणीने आपल्यासाठी एवढ्या कमी किंमतीचा सूट आणल्याचे कळल्यानंतर संतप्त भावाने बहिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याठिकाणाहून दिल्ली महिला आयोगाचे एक पथक त्या परिसरात डोअर – टू डोअर नियमित तपासणी करत होते. त्यावेळी मुलीच्या रडण्याचा अचानक आवाज आला त्यामुळे महिला आयोगाने त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्या पीडित मुलीच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, तिचा भाऊ नेहमीच मारहाण करतो आणि शिव्या देतो. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली महिला आयोगाच्या पंचायत टीमने आयोगाच्या कार्यालयात फोन केला आणि पीडित मुलीच्या बिहारमधील घरी सुद्धा माहिती दिली. त्यानंतर या महिलांनी त्या पीडित मुलीच्या घरात प्रवेश केला. आरोपीने त्या महिलांना विरोध करत त्यांना देखील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र, त्या मुलाला न घाबरता महिलांनी पीडित मुलीच्या घरात प्रवेश केला. पीडित मुलगी ही जमिनीवर पडलेली होती. तिच्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या. तात्काळ त्या तरुणीला उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या तरुणीची प्रकृत्ती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या स्वाती मालिवाल यांनी ट्विट करत म्हटले, ‘१०० रुपयांचा ड्रेस घेतल्याने १७ वर्षीय भावाने बहिणीचे दोन्ही डोळे फोडले. दिल्ली महिला आयोगाचे पंचायत पथक परिसरात विझीट करत असताना घडलेला प्रकार समोर आला. मी रुग्णालयात पीडित मुलीची भेट घेतली. तिची प्रकृती चिंताजनक आहे.


हेही वाचा – अजय देवगणचा सिनेमा पाहून त्याने केला फिल्मी स्टाईल खून!