घरदेश-विदेशVIDEO: रोड शो दरम्यान तरुणाने अरविंद केजरीवालांच्या कानाखाली मारली

VIDEO: रोड शो दरम्यान तरुणाने अरविंद केजरीवालांच्या कानाखाली मारली

Subscribe

शनिवारी अरविंद केजरीवाल यांची नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातील करमपूरा भागामध्ये रोड शो सुरु होता. रोड शो दरम्यान अचानक लाल टी -शर्ट घातलेल्या एका तरुणाने केजरीवाल यांच्या गाडीवर चढून त्यांच्या कानाखाली मारली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलामध्ये लगावल्याची घटना घडली आहे. दिल्लीतल्या करमपूरा येथे अरविंद केजरीवाल यांचा रोड शो सुरु होता. या रोड शो दरम्यान एका तरुणाने अरविंद केजरीवाल यांच्या चक्क कानाखाली मारली. केजरीवालांना कानाखाली मारणाऱ्या तरुणाला रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

शनिवारी अरविंद केजरीवाल यांची नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातील करमपूरा भागामध्ये रोड शो सुरु होता. रोड शो दरम्यान अचानक लाल टी -शर्ट घातलेल्या एका तरुणाने केजरीवाल यांच्या गाडीवर चढून त्यांच्या कानाखाली मारली. या तरुणाने लगेचच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र केजरीवाल यांच्या समर्थकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मात्र अद्याप हा तरुण कोण आहे आणि त्याने हे कृत्य का केले ही माहिती समोर आली नाही. दरम्यान, पोलिसांकडून या तरुणाची चौकशी सुरु आहे. या घटनेनंतरही केजरीवाल यांनी रोड शो सुरुच ठेवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -