घरदेश-विदेशदंगलग्रस्त दिल्ली पूर्वपदावर येतेय

दंगलग्रस्त दिल्ली पूर्वपदावर येतेय

Subscribe

पळून गेलेले लोक अद्याप घरी परतलेले नाहीत

दिल्ली हिंसाचाराने गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांचा जीव घेतला. मात्र आता राजधानी दिल्लीतील जीवन हळूहळू आणि स्थिरतेने पुढे जात आहे. दुकाने उघडत आहेत, वाहने बाहेर येत आहेत. बाजारात हालचाली पाहायला मिळत आहेत. मात्र दंगलीदरम्यान पळून गेलेले लोक अद्याप घरी परतलेले नाहीत. या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा 43 वर पोहोचला आहे. २३३ जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर जवळपास १०० जणांना गोळ्या लागल्या आहेत. यादरम्यान एकूण १४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले की, एकूण ३० लोकांना अटक करून ताब्यात घेण्यात आले असून विशेष तपास पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. महापालिकेने सीलमपूर, भजनपुरा, जाफराबाद, मौजपूर, चांदबाग, शिव विहार आणि करावल नगर यासारख्या दंगलीग्रस्त भागात मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात केले आहे.

अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई
दिल्ली महिला आयोगानेही दंगलीदरम्यान झालेल्या महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांची चौकशी सुरू केली आहे. तर दिल्ली पोलिसांना मार्चपर्यंत दंगली दरम्यान किंवा नंतर झालेल्या लैंगिक गुन्ह्यांच्या घटनांचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक तक्रारीवर लक्ष ठेवले जाईल आणि पीडितांना योग्य मदत आणि आधार देईल असा विश्वास पोलिसांनी दिला आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली पोलीस हिंसाचारग्रस्त भागात अमन समितीची बैठक घेत आहेत. सोशल मीडियावर खोटे आणि अफवा पसरवणारे मेसेज पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच कोणी खोटे मेसेज पाठवलेच तर त्यांच्यावर सायबर सेलचा निशाणा असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -