घरटेक-वेककिंभोचे 'बोलो' अॅप लवकरच होणार अपडेट

किंभोचे ‘बोलो’ अॅप लवकरच होणार अपडेट

Subscribe

व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी करण्यात आली निर्मीती, भारताचे व्हॉट्सअॅप म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न

‘व्हॉट्सअॅप’ ला टक्कर देणारे ‘बोलो’ अॅपला अपडेट करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पतंजली योगपीठाचे प्रवक्ते एस के तोजारावाला यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. किंभोच्या डेव्हलपर्सकडून अॅपवर काम करण्यात येत असून यावर लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्टफोन युजर्स ‘बोलो’ अॅप डाऊनलोड करु शकणार आहेत. मात्र याचे अपडेट व्हर्जन लवकरच लोकांना बघायला मिळाणार असल्याचे डेव्हलपर्स अदिती कमाल यांनी सांगितले आहे.

कसे असेल भारतीय ‘बोलो’ अॅप
बोलो अॅप हे व्हॉट्सअॅप प्रमाणेच काम करणार आहे. स्मार्टफोन्स युजर्सना प्लेस्टोर मध्ये जाऊन बोलो अॅप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर एसएमएसव्दारे त्यांचे व्हेरिफीकेश केले जाईल. या अॅपसाठी नवीन लोगोही बनवण्यात आला आहे. या अॅपमध्येही व्हॉट्सअॅप आणि फेसबुकप्रमाणेच सिक्युरीटी फीचर्स असणार आहेत. ‘बोलो’ अॅप उघडल्यानंतर व्हॉट्सअॅप प्रमाणेच चाट, संपर्क आणि अ‍ॅक्टिव्हीटी असे तीन विभाग दिसणार आहे. याच बरोबर व्हाईस कॉलिंग, व्हिडिओ कॉल आणि विविध इमोजी ही बघायला मिळणार आहे. ‘किंभो’ हा शब्द संस्कृतमधून घेतल्या गेला आहे. ‘नमस्कार’ या शब्दाचा अर्थ होते.

- Advertisement -

विशेष हिंदी स्टिकर्स
बोलो मॅसेजिंगमध्ये भावना व्यक्त करण्यासाठी हिंदी स्टिकर्सचा वापर करु शकता. यामध्ये विविध रंगानी आपण पेनाव्दारे लिहू शकतो. अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही प्रोफाईल संपादन करु शकता. यामध्ये प्रोफाईल फोट, वाढदिवसाची तारीख आणि स्वतःबद्दल माहिती लिहू शकतो. मोबाईल डेटा आणि व्हाय-फायव्दारे स्वतःहून डाऊनलोड होणारा मजकूरांना सेटिंगमध्ये जाऊन थांबवू शकतो. ऑनलाईन दिसणाऱ्या स्टेटसहा लवकण्यासाठी विशेष पर्याय असणार आहे.
“स्वदेशी वस्तूंचा वापर वाढावा यासाठी या अॅपची निर्मीती करण्यात आली आहे.भारतात सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणे आवश्यक आहे.”- डेव्हलपर्स

 

- Advertisement -

योगा गुरु रामदेव बाबांनी किंभो अॅप प्लेस्टोरवर टाकल्या नंतर ३० मे रोजी गुगल प्ले कडून काढण्यात आले होते. यानंतर पुन्हा हे अॅप टाकण्यात आले असून आतापर्यंत १ लाख ५० हजार युजर्सने ते डाऊनलोड केले असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -