कुत्र्याने ३ महिने बघितली हॉस्पिटलच्या बाहेर मालकाची वाट पण…

China
मालकाची वाट बघत कुत्रा बसायचा हॉस्पिटलमध्ये

कोरोनामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. जनजीवनविस्कळीत झालं आहे. सध्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांमुळे माणूसकी संपल्याची अनेक उदाहरणे समोर आली. पण आत्ताची ही बातमी वाचल्यावर नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येईल. आपल्या मालकाला भेटण्यासाठी एक कुत्र्याने तब्बल ३ महिने वाट बघितली. सध्या सोशल मीडियावर या कुत्र्याचीच चर्चा रंगली आहे. जिओ-बाओ नाव असणाऱ्या या कुत्र्याच्या मालकाचा मृत्यू झाला पण या कुत्र्याला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे तो ज्या हॉस्पिटलमध्ये मालकाला अडमिट केलं होतं त्या हॉस्पिटलच्या बाहेर दिवसरात्र वाट बघत बसायचा.

 

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार,  जिओ-बाओच्या मालकाचा शोध लागला तेव्हा सात वर्षांच्या जिओ-बाओ (कुत्र्याचे नाव) चीनमधील वुहान तायकुंग रुग्णालयात तीन महिने थांबला. मग कळले की कोरोनाच्या संसर्गामुळे कुत्र्याच्या मालकास या रुग्णालयात दाखल केले गेले. पण दाखल केल्याच्या ५ दिवसानंतरच मालकाचा मृत्यू झाला.

जिओ बाओला त्याचा मालक परत येणार नाही याची पूर्णपणे कल्पना नव्हती. त्याच्या मालकाचा हा निष्ठावंत कुत्रा त्याच्यासाठी रुग्णालयाच्या लॉबीमध्ये दररोज प्रतीक्षा करायचा. त्याला तिथे दररोज उभे असलेले पाहून रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी त्याच्यासाठी एक खास जागा तयार केली.  कुत्राला असे पाहून जवळच्या इमारतीत सुपरमार्केट चालवणाऱ्या एका महिलेने या कुत्र्याची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी स्विकारली. पण त्या महिलेजवळ न राहता हा कुत्रा रुग्णालयाच्या गेटवर उभा राहिला.

डेली मेलच्या वृत्तानुसार वू किफेन (एक रुग्णालयात काम करणारा एक माणूस) म्हणाला, “मी हा कुत्रा एप्रिल महिन्यात सर्वप्रथम रुग्णालयाच्या गेटवर बसलेला पाहिला. ते पाहिल्यावर मी त्याला ‘जिओ बाओ’ म्हटले. नंतर, मी त्याला दररोज हॉस्पिटलच्या गेटवर बघायचो तेव्हा मला कळले की जिओ-बाओच्या मालकाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बर्‍याच वेळा जिओ-बाओला अनेकवेळा दुसर्‍या ठिकाणी हलविण्यात आले. जेणेकरून याची चांगली काळजी घेतली जाऊ शकते. परंतु तो वारंवार रुग्णालयाच्या गेटवर येतो.


हे ही वाचा – औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराचा अचानक मृत्यू, कोरोना चाचणी केली पण…