घरदेश-विदेशतामिळनाडूत अपघाताच्या कारणावरून दोन समुदाय भिडले; ३७ जणांना अटक

तामिळनाडूत अपघाताच्या कारणावरून दोन समुदाय भिडले; ३७ जणांना अटक

Subscribe

याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही समुदायातील ३७ जणांना अटक केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून घटनास्थळी ४०० पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

तामिळनाडूतील वेदारण्यम येथे एका अपघातामुळे दोन समुदाय एकमेकांना भिडले. या अपघाताच्या कारणावर हिंसक झालेल्या दोन्ही समुदायातील लोकांनी रस्त्यावर दगडफेक, जाळपोळ केली. या जाळपोळीत तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही समुदायातील ३७ जणांना अटक केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून घटनास्थळी ४०० पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक, जाळपोळ

वेदारण्यम येथे चालत जात असलेल्या एका दलित व्यक्तीला कारचालकाने धडक दिली. या अपघातात त्या व्यक्तीच्या पायाला गंभीर जखम झाली. अपघातानंतर कारचालकाने वेदारण्यम येथील पोलीस ठाणे गाठले. दरम्यान जखमी व्यक्तीला वेदारण्यम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दरम्यान कारचालकाने मागे झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी हे कृत्य केल्याची अफवा सर्वत्र पसरली. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या समुदायातील नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. बाहेर जमलेल्या लोकांनी कारचालकाला बाहेर आणण्याची मागणी केली. यावेळी जमावाने पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक, जाळपोळ केली.

- Advertisement -

हेही वाचा – तामिळनाडूच्या गंगाई अम्मन मंदिराजवळ स्फोट; १ ठार, ४ जखमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

या घटनेची माहिती कार चालकाच्या समुदायातील लोकांना कळल्यानंतर कारचालकाचे समर्थकही पोलीस ठाण्याबाहेर जमले. या जमावानेही पोलीस ठाणे आणि बस स्थानक रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अपघातातील जखमीवर ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, त्या हॉस्पिटल बाहेरसुद्धा जमावाने राडा केला.

४०० पोलिसांचा बंदोबस्त, ३७ जणांना अटक

सदर घटनेनंतर परिसरातील पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला. या घटनेनंतर तिरूची परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक व्ही. वरदराजू यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ”सदर घटनेनंतर परिसरात ४०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली असून या प्रकरणी परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोन्ही समुदायातील ३७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती, पोलीस उपमहानिरीक्षक जे. लॉगनाथन यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -