घरदेश-विदेश'जेट' एअरवेजचे संस्थापक गोयल यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे

‘जेट’ एअरवेजचे संस्थापक गोयल यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे

Subscribe

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबई, दिल्लीस्थित निवासस्थान आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने छापे मारले आहेत.

कोहिनूर गैरव्यवहार प्रकरणी गुरुवारी दिवसभर फक्त एकाच गोष्टीची चर्चा होती, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीची. कोहिनूर गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजवणी संचलनालय (ईडी) कडून तब्बल आठ तासांहून अधिक वेळ राज ठाकरे यांची चौकशी करण्यात आली होती. हे प्रकरण ताज असतानाच आता जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबई, दिल्लीस्थित निवासस्थान आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने छापे मारले आहेत. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे मारण्यात आले आहेत.

यासाठी मारण्यात आले छापे

परकीय चलन विनिमय अधिनियमातील (FEMA) तरतुदींच्या आधारे अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी ही छापेमारी करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. जेट एअरवेज ही कंपनी १७ एप्रिल रोजी बंद पडली असून कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या चौकशी अहवालात कंपनीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही छापे मारी करण्यात आली आहे. दरम्यान, मार्च महिन्यात गोयल एअरलाइनच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले असून सध्या जेट एअरवेज आर्थिक डबघाईला आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरे नऊ तास ईडीच्या कार्यालयात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -