घरदेश-विदेशमेड इन इंडिया कोविशील्डच्या आपत्कालीन वापरासाठी भारतात परवानगी

मेड इन इंडिया कोविशील्डच्या आपत्कालीन वापरासाठी भारतात परवानगी

Subscribe

कोविशील्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी पहिली परवानगी मिळाली आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने ही पहिली अटींसह असणारी परवानगी दिली आहे. पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट आणि ऑक्सफर्डमार्फत तयार करण्यात आलेल्या कोविशील्डला ही पहिल्या टप्प्यातील परवानगी मिळाली आहे. देशात शनिवारपासून ड्रायरन सुरू होत असतानाच ही परवानगी मोठे अपडेट असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. या मंजुरीला कंडिशनल परवानगी असे संबोधण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही परवानगी ही भारतीयांसाठीची मोठी आनंदाची बातमी आलेली आहे.

या लशीच्या आपत्कालीन वापरासाठीच्या परवानगीमुळे गंभीर अवस्थेतील रूग्णासाठी तसेच आपत्कालीन वापरासाठी ही लस वापरता येणार आहे. सध्याच्या ड्राय रनच्या मोहीमेनुसार ही लस लवकरच भारतीयांना मिळणार आहे. दुपारी बैठकीला सुरूवात. अहवालाच्या अंती ही परवानगी दिली आहे.  ही लस देणे सोप असून देशातील पहिलीची मेड इन इंडिया अशी लस आहे. या लसीचा खूप लोकांना फायदा होणार आहे. सीरमने याआधीच ४ कोटी ते ५ कोटी लशी भारतीयांसाठी उपलब्ध करून देणार हे सीरमकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण या समितीने लसीचा परवानगी देताना अनेक अटी घातल्या आहेत. या लसीचे दोन डोस द्यावे लागतील. दुसरा डोस कधी देण्यात येणार याबाबत कोणतेही स्पष्टीकरण सध्या नाहीए.

- Advertisement -

देशभरात ७ जानेवारी ते १४ जानेवारीपर्यंत लसीकरण सुरू होऊ शकते असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सीरमच्या लशीचा युकेमध्ये पहिला टप्पा पार पडला आहे. त्यापाठोपाठ मुंबईतही केईएम हॉस्पिटलमध्ये लशीची चाचणी१६० निरोगी व्यक्तींवर करण्यात आली आहे. या चाचणीचे एकुण तीन टप्पे पार पडले होते. लसीकरण कार्यक्रमाचा ड्राय रन हा महाराष्ट्रात एकुण चार जिल्ह्यात घेण्यात आला. तर देशातही चार राज्यात हा ड्राय रन घेण्यात आला. मुंबईतही लसीकरणाच्या कार्यक्रम अतिशय सज्ज झाला असून चार मेडिकल कॉलेज, पेरीफेरल कॉलेज हे या ड्राय रनसाठी सज्ज झाले आहेत.


 

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -