घरदेश-विदेशकोरोनाला हरविण्यासाठी 'या' पाच कंपन्या लस तयार करण्यास सज्ज!

कोरोनाला हरविण्यासाठी ‘या’ पाच कंपन्या लस तयार करण्यास सज्ज!

Subscribe

अमेरिकन प्रशासनाने लसीसाठी ५ कंपन्यांची निवड

जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत असून कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील जवळपास २०० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला असून या जीवघेणा कोरोनाला हरविण्यासाठी अनेक देशांतील साधारण शंभराहून अधिक कंपन्या प्रयत्नशील आहेत. यातील काही कोरोना प्रतिबंधक लस महत्त्वाच्या टप्प्यावर असून काही कंपन्यांनी आपली लस प्रभावी असल्याचा दावा केला असून त्याच्या अंतिम चाचणीकडे त्यांनी वाटचाल केली आहे.

अमेरिकन प्रशासनाने लसीसाठी ५ कंपन्यांची निवड

दरम्यान, अमेरिकेने पाच कंपन्यांच्या लसींवर विश्वास दाखवला असून त्यासंदर्भातील महत्त्वाची घोषणा लवकर होण्याची शक्यता आहे. अमेरिकन प्रशासनाने लसीसाठी पाच कंपन्यांची निवड केली आहे. यामध्ये मॉडर्ना इंक, एस्ट्राजेनेका पीएलसी, फाइजर इंक, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि मर्क एंड को इंक यांचा समावेश आहे. या कंपन्यांना लस विकसित करण्यासाठी अतिरिक्त निधीदेखील देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या लसीच्या माहितीबाबत येत्या काही दिवसांमध्ये व्हाइट हाउसकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.

- Advertisement -

यासह अनेक अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञ सध्या या लसींवर काम करत असून या वर्ष अखेरपर्यंत कोरोनावर लस तयार होईल, असा दावा यापुर्वीच करण्यात आला होता. येत्या एक-दोन महिन्यात या लस चाचणीचा अंतिम टप्पा पूर्ण होणार आहे. मॉडर्ना आणि एस्ट्राजेनेका ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसींची चाचणी महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, या लसींची मोठ्या प्रमाणावर क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार आहे. यासाठी साधारण एक लाख स्वयंसेवकांची आवश्यकता भासणार आहे. अमेरिकन प्रशासनाने निवड केलेल्या कंपन्यांची उत्पादन क्षमता अधिक चांगली असून डोस निर्मिती करण्यासाठीचे आव्हान पेलण्यास या कंपन्या सक्षम आहेत.

मॉडर्ना इंकने केलेल्या दाव्यानुसार, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये आढळणाऱ्या अॅण्टीबॉडीज एवढी पातळी ही लस दिलेल्या व्यक्तींमध्ये आढळली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. टाल जॅक्स यांनी सांगितले की, या लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात mRNA-१२७३ ही लस कोरोनावर प्रभावी ठरू शकते, असे आढळले असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. दरम्यान, चीनमध्ये ही एका कंपनीने आपली लस ९९ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. तर ही लस पहिल्या टप्प्यात यशस्वी झाली असून दुसऱ्या टप्प्यातील चाचणी युरोपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.


अतिताण, मधुमेहाच्या आजारांमुळेच कोरोना रुग्णांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -