घरलोकसभा २०१९जरा हटकेएकेकाळच्या खासदारांना निर्वाहासाठी वळाव्या लागतात विड्या!

एकेकाळच्या खासदारांना निर्वाहासाठी वळाव्या लागतात विड्या!

Subscribe

हे माजी खासदार आज देखील सायकलवरुन प्रवास करतात. त्यांच्याकडे कोणतीही चार चाकी गाडी नाही!

आजच्या काळात लोकसभेवर निवडून जाणारा खासदार असो अथवा एखाद्या ग्रामपंचायतीचा सरपंच, सगळ्यांकडे चार चाकी गाडी असते. लाखो रुपयांची संपत्ती असते. मात्र मध्यप्रदेशच्या बुंदेलखंड येथून लोकसभेवर निवडून गेलेले असे एक खासदार आहेत जे या सगळ्याला अपवाद आहेत. साधी राहणी, उच्च शिक्षित आणि लोकांमध्ये राहणारे असे नेते म्हणून ते त्या ठिकाणी सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. राम सिंह अहिरवार असे त्यांचे नाव असून ते विड्या वळून आपले जीवन कंठत आहेत. तसेच वयाच्या ८२ व्या वर्षात देखील अजूबाजूच्या परिसरात ते सायकलने प्रवास करतात हे विशेष आहे.

‘साईकल वाले नेताजी’

मध्यप्रदेशच्या बुंदेलखंडमधील सागर शहरात एका सामान्य घरात ते वास्तव्यास आहेत. आजूबाजूच्या काही किलोमीटरच्या परिसरात सायकल चालवून ते आजही लोकांच्या भेटी गाठी घेतात. त्यामुळे माजी खासदार राम सिंह अहिरवार यांना तेथील लोक ‘साईकल वाले नेताजी’ म्हणून हाक मारतात. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची चार चाकी गाडी नसून चार चाकी वाहनाची कधी गरजच भासली नाही असे ते म्हणतात. तसेच गाडी घेण्याचा नातर कधी विचार केला नातर तसा कधी प्रयत्न केला असे देखील ते सांगतात. सायकल आणि रामसिंह यांचे एक प्रकारे अतूट नाते आहे. ते ८२ वर्षांचे असून काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. मात्र तरी देखील त्यांनी सायकल चालवणे सोडले नाही. आपल्या उदर निर्वाहासाठी आणि विरंगुळा म्हणून ते विड्या वळतात.

- Advertisement -

उच्च शिक्षित

एन.डी.टीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार १९६७ साली भारतीय जनसंघ पक्षाकडून त्यांनी लोकसभा लढवली आणि ते निवडून देखील आले. माजी खासदार असलेले राम सिंह अहिरवार यांनी दर्शन शास्त्र आणि इंग्रजी साहित्यात मास्टरेटची पदवी मिळवली आहे. ८२ वर्षांचे असून देखील आजही सायकलवरुन फिरणे, लोकांशी संवाद साधने, विड्या वळणे, साधी राहणी, संपत्तीचे वलय नसलेल्या या खासदाराच्या प्रवासाकडे पाहिलं की आश्चर्य वाटतं. नुकतेच निधन झालेले माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री देखील त्यांच्या साध्या राहणीसाठी ओळखले जायचे. मुख्यमंत्री असताना अनेक वेळा ते सायकलवरुन फेरफटका मारायचे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -