घरदेश-विदेशबारामुल्लामध्ये चकमकीदरम्यान ४ दहशतवाद्यांचा खात्मा

बारामुल्लामध्ये चकमकीदरम्यान ४ दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात पाकिस्तांकडून गोळीबार सुरु आहे. बारामुल्ला येथे दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे. दरम्यान झालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. आज पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रस्ंधीचे उल्लंघन केले आहे. बारामुल्लातील लाधोरा जंगलात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकी दरम्यान चार दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. तर चकमकीवेळी एक जवान जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार सुरु आहे.

- Advertisement -

गस्तीवर असलेल्या जवानांवर गोळीबार

सीमाभागामध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी सुरु आहे. त्यामुळे सीमाभागात जवानांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळपासून बारामुल्लाच्या राफियाबाद येथे पाकिस्तांकडून गोळीबार सुरु होता त्यामुळे जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु केले होते. याठिकाणी गस्तीवर असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार गेला. दरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये एक जवान जखमी झाला. तर ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. सध्या या भागामध्ये चकमक सुरु आहे.

मंगळवारी झालेल्या चकमकीत ४ जवान शहीद

जम्मू- काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये मंगळवारी ८ दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. दरम्यान दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. मात्र या चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद झाले. शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर के. पी. राणे, जवान मनप्रितसिंग रावत, जवान हमीर सिंग आणि रायफलमॅन विक्रमजीत सिंग यांना वीरमरण आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -