सोनं लवकरच जाणार ‘पन्नाशी’च्या घरात..

काही दिवसांत देशभरातील सोन्याचे दर प्रति तोळा ५० हजारावर पोहचून सोनं लवकरच जाणार 'पन्नाशी'च्या घरात दाखल

Mumbai

गेल्या काही दिवसांपासून सोनं खरेदी करण्यास ग्राहकांची गर्दी होत असून सोनं विक्री वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक कारणांमुळे सोनं खरेदीचा वेग वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस १५५० डॉलरवर असलेले सोन्याचे दर आता २००० डॉलरपर्यंत पोहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशभरात सोन्याचे दर वर्षाच्या शेवटपर्यंत प्रति तोळा ५० हजारांवर जाऊन पोहचणार असे ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ मार्फत सांगण्यात येत आहे.

काही दिवसांवर नवरात्री, दसरा तसेच लग्न सराईचा कालावधी येत असल्याने मोठ्या प्रमाणावर सोन्याच्य़ा दागिन्यांची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल अधिक असतो. मात्र ऐन सणा-सुदीच्या तोंडावर सोन्याने पन्नाशी गाठली असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी भावना दिसून येत आहे.


हेही वाचा- मार्केटची हवा, काय आहे भावा ?

जाणकारांच्या अंदाजानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति औंस १५५० डॉलर असून आगामी काळात ते प्रति औंस २००० डॉलरवर पोहोचणार आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम आणि १ डॉलर म्हणजे ७० रुपये) यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारापेठेत सोन्याचे दर प्रति औंस १५५० डॉलर अर्थात १ लाख ८ हजार ५०० रूपये म्हणजे प्रतिग्रॅम ३ हजार ८२७ रूपयांवर आहे.

या दरानुसार आज देशभराच सोन्याचे दर देखील काहीसे तेवढेच असणार आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याचे दर प्रति औंस २००० डॉलरवर गेल्यास देशातील सोन्याचे भाव देखील प्रति ग्रॅम ४ हजार ९३८ रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच काही दिवसांत देशभरातील सोन्याचे दर प्रति तोळा ५० हजारावर पोहचून सोनं लवकरच जाणार ‘पन्नाशी’च्या घरात दाखल होणार आहे.