लवकर करा सोनं खरेदी, दोन दिवसांत १ हजार रुपयांनी झालं स्वस्त

Gold Price Today: Gold declines Rs 631, silver tumbles Rs 1,681
लवकर करा सोनं खरेदी, दोन दिवसांत १ हजार रुपयांनी झालं स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या भावात घसरण होताना दिसत आहे. मागील दोन दिवसांत १ हजार रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. दरम्यान अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. बुधवारी दिल्लीतील सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची किंमतीत घसरण झाली आहे. सोन्याची किंमत ६३१ रुपयांनी कमी होऊन ५१ हजार ६६७ प्रति तोळावर पोहोचली होती. तर चांदीची किंमत १ हजार ६८१ रुपयांनी घसरून ६१ हजार १५८ प्रति किलोग्रॅमवर पोहोचली. रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत घसरल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं.

सोनं मंगळवारी ५१ हजार ९९८ रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीची किंमत ६३ हजार ८८९३९ रुपये प्रति किलोग्रॅम बंद झाली होती. रुपयांची मुल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत वधारले होते. त्यामुळे ७३.३१ रुपये प्रति डॉलरवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची किंमत १ हजार ८९६ डॉलर प्रति औंस तर चांदी २४.१६ डॉल प्रति औंस आहे.

दरम्यान वायदे बाजारामध्ये सोन्याची किंमत वधारली असून सोन्याचे दर येथे १३६ रुपये म्हणजे ०.२७ टक्क्यांनी वाढून ५० हजार ३८१ रुपयांवर पोहोचली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची किंमत १३६ रुपयांनी वाढून ५० हजार ३८१ प्रति तोळा झाली आहे.

यामुळे सोनं झालं स्वत!

अमेरिकेतील स्टिम्यूलस पॅकजमुळे शेअर बाजारात तेजी आली आहे. म्हणून सोन्याचे दर कमी होत आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून रुपयाची किंमत वधारत आहे. त्याच्या परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला असून दिवाळीपर्यंत आणखीन सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांच्या मते आहे.

पण पुढील वर्षापर्यंत डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमतीत अचानक वाढ होऊ शकते. सोन्यामध्ये काही काळच कमजोरी असेल, असे मत कमोडिटी आणि करन्सी सेगमेंटचे व्हाउस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांनी व्यक्त केले आहे. सोन्याची मागणी वाढल्यामुळे दिवाळी दरम्यान किंमत पुन्हा वाढू शकते. यामुळे पुन्हा ५२ हजारांवर सोन्याची किंमत पोहोचू शकते. तसेच डिसेंबर महिन्याच्या अखेरस सोन्याची किंमत ५६ हजार प्रति तोळाचा टप्पा गाळू शकते. पण आता ४७ हजार ते ४८ हजार रुपये प्रति तोळाच्या जवळपास सोन्याची किंमत येण्याची अधिक शक्यता आहे.