घरटेक-वेकबंगळूरुच्या विद्यार्थ्याला गुगलची १.२ कोटीची ऑफर

बंगळूरुच्या विद्यार्थ्याला गुगलची १.२ कोटीची ऑफर

Subscribe

२२ वर्षांच्या विद्यार्थ्याला गुगल आर्टिफिशियल इंटेलिटन्सवर रिसर्च करण्यासाठी गुगलनं १.२ कोटीच्या पगाराचा प्रस्ताव दिला आहे. या विद्यार्थ्याचं नाव आदित्य पालिवाल असं असून रविवारी महाविद्यालयात दीक्षांत समारंभ आहे.

बंगळूरूच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या (IIIT) २२ वर्षांच्या विद्यार्थ्याला गुगल आर्टिफिशियल इंटेलिटन्सवर रिसर्च करण्यासाठी गुगलनं १.२ कोटीच्या पगाराचा प्रस्ताव दिला आहे. या विद्यार्थ्याचं नाव आदित्य पालिवाल असं असून रविवारी महाविद्यालयात दीक्षांत समारंभ आहे.

५० विद्यार्थ्यांमध्ये आदित्यचा क्रमांक

आदित्य पालिवाल हा मुंबईतील असून इंटीग्रेटेड एमटेकचा विद्यार्थी आहे. “गुगलनं आर्टिफिशियल इंटेलिटिन्सच्या टेक्नॉलॉजीवर रिसर्च करण्यासाठी एक परीक्षा घेतली होती. ज्यामध्ये संपूर्ण जगभरातील ६००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि त्यातून ५० विद्यार्थ्यांना निवडण्यात आलं.” असं आदित्यनं न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. गुगलनं ५० विद्यार्थ्यांमध्ये आदित्यची निवड केली आहे. आदित्य पालिवाल २०१७ – २०१८ च्या एसीएम इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोगॅमिंग कॉन्टेस्ट (आयसीपीसी) च्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. ही स्पर्धा कॉम्प्युटर कोडिंग प्रोग्रामसंबंधित आहे. एप्रिलमध्ये झालेल्या या स्पर्धेत सिमरन दोजानिया आणि श्याम केबीदेखील त्याच्याबरोबर होते. १११ देशांमधील ३०९८ विश्वविद्यालयातील साधारण ५० हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

- Advertisement -

१६ जुलैपासून गुगलबरोबर काम सुरु

आदित्य पालिवाल १६ जुलैपासून गुगलसह कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती त्यानं दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव आदित्यला मिळाला असून त्यानं या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे. तर, गुगलबरोबर काम करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतील आणि रिसर्च करायला मिळेल अशी आशा त्यानं व्यक्त केली आहे. तर आपल्या यशामध्ये सिनिअर्सचा खूप मोठा वाटा असल्याचंही त्यानं नमूद केलं आहे. प्रोगॅमिंग व्यतिरिक्त आदित्यला फुटबॉल, क्रिकेट आणि ड्रायव्हिंगची आवड असल्याचंही सांगितलं आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -