घरदेश-विदेशHSBC च्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार!

HSBC च्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार!

Subscribe

उद्योग क्षेत्रामध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाल्याने HSBC तून १० हजार कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता

सर्वच क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या मनात एकप्रकारची धाकधूक आहे. कारण सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे चित्र दिसत आहे. HSBC च्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय HSBC च्या होल्डिंग्ज पीएलसीकडून घेण्यात आला आहे. या बँकिंग समुहाचा खर्च कमी करण्यासाठी HSBC चे कार्यकारी अधिकारी नोएल क्विन हे या आगामी नोकरकपातीची योजना तयार करताना दिसत आहेत.

- Advertisement -

नुकतेच, फायनान्शिअल टाईम्सने दिलेले वृत्तानुसार महिन्याच्या शेवटी होणाऱ्या परिणामांच्या अहवालाची घोषणा करताना यावेळी कॉस्ट कटिंग अर्थात नोकर कपातीची घोषणा देखील करू शकतात. तसेच, ही कपात जास्त पगार असणाऱ्या पदांच्या बाबतीत करण्यात येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

चीन आणि अमेरिकेमध्ये व्यापार युद्धाची पातळी वाढल्याने उद्योग क्षेत्रामध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे HSBC तून १० हजार कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – आज भाजप-शिवसेनेची सत्व परीक्षा; अन्यथा युतीच्या उमेदवारांना फटका

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -