घरदेश-विदेश'तुझे पाय तोडून टाकेन' केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रीयोची दिव्यांगाला धमकी

‘तुझे पाय तोडून टाकेन’ केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रीयोची दिव्यांगाला धमकी

Subscribe

भाजपचे अनेक नेते वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. यातच आता आणखी एका नेत्याची भर पडली आहे. केंद्रीय मंत्री आणि एकेकाळचे बॉलिवूडचे गायक बाबुल सुप्रीयो यांनी एका कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तीला त्याचे पाय तोडून टाकेन, अशी धमकी दिली. विशेष म्हणजे सुप्रियो यांनी ज्या कार्यक्रमात ही धमकी दिली तो दिव्यांगासाठीच आयोजित करण्यात आला होता. या धमकीचा व्हिडिओ आता व्हायरल होत असून यामुळे बाबुल सुप्रियो यांच्यावर टीका होत आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या आसनसोल येथे बाबुल सुप्रियो दिव्यांगाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. दिव्यांगाना व्हिलचेअर आणि इतर साहित्य वाटण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रेषकात बसलेली एक व्यक्ती सारखी हालचाल करत होती. त्यानंतर सुप्रियो यांनी त्या व्यक्तीला एका जागी बसण्याची सूचना केली. तसेच बाजुला असलेल्या सुरक्षाकर्मींना सांगितले की, या व्यक्तिला एका जागीच उभे करा नाहीतर त्याचा पाय तोडून टाका. मी त्याला एक काठी देऊन टाकेल आणि मग त्यांनी उपस्थितांना टाळ्या वाजवायला सांगितल्या.

बाबुल सुप्रियो यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. आपचे माजी नेते आणि वकिल प्रशांत भुषण यांनीही ट्विट करत म्हटले की, हीच भाजपची संस्कृती आहे, त्यांना सत्तेचा माज आलाय.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -