घरदेश-विदेशमॅगी खाताय तर सावधान!

मॅगी खाताय तर सावधान!

Subscribe

नेस्ले इंडियाची मॅगी पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. मॅगी खाल्ल्याने मध्यप्रदेशमध्ये ९ मुलांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे.

मध्य प्रदेशच्या छत्तरपूरमध्ये मॅगी खाल्ल्यामुळे मॅगी खाल्ल्याने मुलांची प्रकृती बिघडली आहे. या घटनेमुळे मॅगीच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. छत्तरपूर गावामध्ये रहाणाऱ्या ९ मुलांना ११ रुपयांची मॅगी खाणे महागात पडले आहे. मॅगी खाल्ल्याने या मुलांची तब्बेत खराब झाली. त्यांना ग्वालियर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

नालासोपारा पश्चिम येथील जयमाला इमारतीत राहणारे पूनम शाह यांनी घेतलेल्या मॅगी पॅकेटमध्ये चक्क आळ्या सापडल्या होत्या. त्यांनी डि-मार्टमधून फेब्रुवारी महिन्यामध्ये सामान भरले होते. या सामानामध्ये त्यांनी मॅगीचे पॅकेट घेतले होते. हे पॅकेट खोलल्यानंतर त्यामध्ये मॅगीसोबत आल्या आणि किडे आढळल्याचे समोर आले होते.

२०१५ मध्ये राज्यात मॅगीच्या नमुन्यात शिसाचे प्रमाण आढळले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मॅगीवर बंदी लागू केली होती. मॅगी’ नूडल्सवर महाराष्ट्र सरकारने बंदी घातल्यानंतर कंपन्यांकडे माल परत पाठविण्यात आला. या बंदीच्या निर्णयानंतर नेस्ले इंडियाने मॅगी नूडल्सची पाकिटे नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. मॅगीची पाकिटे जाळण्यासाठी २० कोटी रुपयांचा खर्च देण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -