घरदेश-विदेशमतदानासाठी इन्स्टाग्रामचं खास इमोजी

मतदानासाठी इन्स्टाग्रामचं खास इमोजी

Subscribe

या खास इमोजीतून तरूणांना एक प्रकारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

इन्स्टाग्रामची क्रेझ भारतीय तरूणांमध्ये किती आहे हे वेगळं सांगळ्यांची गरज नाही. आता फेसबुकपेक्षाही इन्स्टाग्रामवर सगळे सतत असतात. इन्स्टावर आपली स्टोरी अधिक उत्तम दिसावी यासाठी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये वेगवेगळ्या इमोजीचा वापर आपण करू शकतो. इन्स्टाग्रामही आपल्या फ्रेंड्ससाठी नवनवीन इमोजी आणत असतं. यावेळी इन्स्टाग्रामने मतदानाशी संबंधीत खास इमोजी आणली आहे.

insta voting symbol

- Advertisement -

सध्या भारतामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दरवेळी गुगल आपल्या सर्च इंजिनद्वारे भारतीयांना मतदानाची आठवण करून देण्याकरीता खास डूडल साकारत असतं. त्याचप्रमाणे इन्स्टाग्रामनेही इन्स्टास्टोरीसाठी आपल्या इमोजीजमध्ये खास मतदानासाठी नवीन इमोजी आणली आहे. यात ‘हाताचं बोट आहे आणि या बोटावर शाई लावली आहे’ अशी ती इमोजी आहे.

इन्स्टाग्रामवर फ्रेंड्सची मर्यादा नसल्यामुळे तुम्ही एकवेळी अनेकांना फॉलो करू शकतात. केवळ मराठी कलाकार नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांचा रोजचा दिवस कसा आहे हे आता इन्स्टाग्राममुळे चाहत्यांना कळणे खूप सोपं झालं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस इन्स्टाग्रामवर तरूणांच्या संख्येत वाढ होत आहे. हेच लक्षात घेऊन खास भारतातील मतदानासाठी इन्स्टाने हे खास इमोजी आणलं आहे.

- Advertisement -

मतदान कर्तव्यच नाही तर अधिकार

या खास इमोजीतून तरूणांना एक प्रकारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्यच नाही तर अधिकार देखील आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क नक्की बजावा. याच पार्श्वभूमीवर भारताच्या लोकसभा निवडणुकांची दखल घेत इन्स्टाग्रामने भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -