घरदेश-विदेशनिर्भयाला न्याय मिळावा म्हणून अमित शहांना लिहीलं रक्ताने पत्र!

निर्भयाला न्याय मिळावा म्हणून अमित शहांना लिहीलं रक्ताने पत्र!

Subscribe

सात वर्षापूर्वी निर्भया बलात्कारप्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. आजही या प्रकरणामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जाते. निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवण्याची मागणी जोर धरतेय. आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह हीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने लिहीलेलं पत्र पाठवलं आहे. निर्भयाच्या चारही दोषींना एका महिलेच्या हातून फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

“निर्भयाच्या दोषींना माझ्या हातून फाशी दिली गेली पाहिजे. त्यामुळे एक महिलाही फाशी देऊ शकते असा संदेशा संपूर्ण देशभरात जाईल. महिला कलाकार आणि खासदारांनी माझं समर्थन करावं, यामुळे समाजात बदल घडेल अशी अपेक्षा आहे”, अशा आशयाचं पत्र वर्तिकाने लिहिलंय. विशेष म्हणजे हे पत्र तिने रक्ताने लिहिलंय.

१६ डिसेंबर २०१२ ला निर्भयावर धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी बलात्कार केला होता. या घटनेने सारा देश हादरला. निर्भयावर बलात्कार करून तीला मारण्याचाही प्रयत्न झाला. या आत्याचारानंतर अकरा दिवसांनी अखेर निर्भयाची मृत्यूशी झुंज संपली आणि २९ डिसेंबरला निर्भयाने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणानंतर संपूर्ण देश पेटून उठला. आंदोलनं झाली, मोर्चे निघाले. या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा झाली असून एक दोषी अल्पवयीन असल्याने दोन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली. एका दोषीने तुरुंगातच आत्महत्या केली. या प्रकरणी 18 डिसेंबर रोजी सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणातील फाशीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -