घरताज्या घडामोडीइस्त्रोची पुन्हा यशस्वी कामगिरी; जीसॅट-३० प्रक्षेपित, इंटरनेट होणार सुपरफास्ट

इस्त्रोची पुन्हा यशस्वी कामगिरी; जीसॅट-३० प्रक्षेपित, इंटरनेट होणार सुपरफास्ट

Subscribe

इस्त्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी केली आहे. आज पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून ‘जीसॅट-३०’ या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी रित्या प्रक्षेपण केलं आहे. या ‘जीसॅट-३०’ उपग्रहामुळे इंटरनेटच्या युगात मोठी क्रांती होणार आहे. या उपग्रहाचे इंटनेटचा स्पीड वाढण्यासाठी मदत होणार आहे.

- Advertisement -

या अगोदर ‘इनसॅट-४ ए’ हा उपग्रह २०१५ मध्ये लाँच करण्यात आला होता. या उपग्रहाची मर्यादा संपत असल्यामुळे इस्त्रोनं ‘जीसॅट-३०’ या दुसरसंचार उपग्रह लाँच केला आहे. आता ‘इनसॅट-४ ए’च्या ऐवजी ‘जीसॅट-३०’ हा उपग्रह १५ वर्षे कार्यरत असणार आहे. सुमारे ३१०० किलो ‘जीसॅट-३०’ या उपग्रहाचे वजन आहे. या उपग्रहामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे. जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये जीसॅट-३० ला स्थापित केलं आहे.

- Advertisement -

या उपग्रहाचा वापर व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी होणार आहे. तसंच हवामानाचं भाकित आणि जलवायूमध्ये होणारे बदल वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.


हेही वाचा – अरेच्चा! लग्नानंतर समजले वधू ‘ती’ नसून ‘तो’ आहे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -