घरCORONA UPDATEचीन सुधारणार नाही; इटलीने मदत म्हणून दिलेले पीपीई त्यांनाच विकतंय!

चीन सुधारणार नाही; इटलीने मदत म्हणून दिलेले पीपीई त्यांनाच विकतंय!

Subscribe

चीन इटलीला पीपीई दान म्हणून देणार असल्याचं चीननं जगाला दाखवून दिलं. पण चीनचा खोटा चेहरा समोर आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात वाढत आहे. विकसनशील देश इतर देशांना याचा सामना करण्यासाठी मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. पण या कठीण काळातही चीन फायदा कसा होईल हेच बघतंय. ब्रिटन मॅगझिन ‘द स्पेक्टेटर’ने दिलेल्या माहितीनूसार, जेव्हा चीनमध्ये कोरोना विषाणु वेगाने पसरत होता, तेव्हा इटलीने मदतीसाठी हात पुढे केला. इटलीने चीनला वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) दान केली. दरम्यान आता इटलीला पीपीईची नितांत गरज असताना चीन इटलीने दान म्हणून दिलेली पीपीई इटलीलाच विकत आहे. वुहानपासून पसरलेल्या कोरोना विषाणूचा परिणाम युरोपमधीलत इटलीमध्ये सर्वाधिक झाला आहे. कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे १५ हजार ८८७ लोकांनी प्राण गमावला आहे.


हेही वाचा – Coronavirus: आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर करणार कोरोनाग्रस्तांवर उपचार

- Advertisement -

स्पेक्टेटरच्या वृत्तानुसार, या संकटाच्या काळात मानवतेचा मुखवटा घालून चीन इटलीला पीपीई दान म्हणून देणार असल्याचं चीननं जगाला दाखवून दिलं. पण चीनचा खोटा चेहरा समोर आला आहे. कित्येक अहवालात असं समोर आलं आहे की चीनने इटलीला पीपीई दान केले नाहीत तर ते विकले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्याने या मासिकाचा संदर्भ देत सांगितलं की, चीन इटली आणि विकसनशील देशांना मदत करण्याचं नाटक करत आहे. अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं की कोरोना विषाणुची पहिली घटना मागील वर्षी चीनच्या वुहानमध्ये झाली होती. ज्याने आपल्या सर्वांना संक्रमित केले आहे. चीनने नक्कीच मदत केली पाहिजे. चीनने इतर देशांना पुरविलेल्या गोष्टी सदोष असल्याचं दिसून आलं. या कारणास्तव स्पेनने चीनला ५० हजार कोरोना टेस्टिंग किट परत केली आहेत. नेदरलँड्सने तक्रार केली आहे की चीनने पाठविलेले निम्मे मास्क सुरक्षेचं निकष पूर्ण करत नाहीत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -