घरदेश-विदेश'हिंदू हा शब्द मुघलांनी दिला, ब्रिटिशांनी पुढे वापरला'

‘हिंदू हा शब्द मुघलांनी दिला, ब्रिटिशांनी पुढे वापरला’

Subscribe

अभिनेता ते नेता असा प्रवास केलेला दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन हे सध्या राजकीय वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून देत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी नथुराम गोडसे हा हिंदू धर्मातील पहिला दहशतवादी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता हिंदू हा शब्द मुळात आपला नाहीच, आक्रमणकारी मुघलांनी आपल्याला हिंदू शब्द दिला आणि ब्रिटिंशांनी पुढे हाच शब्द आपली ओळख सांगण्यासाठी वापरला. आपल्या धर्मासाठी हिंदू शब्द वापरणे गैर असल्याचे मत कमल हासन यांनी व्यक्त केले आहे.

मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी काल आपल्या ट्विटर अकाऊंटवर तामिळ भाषेत एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी सांगितले की मुघलांनी आपल्याला हिंदू म्हणून संबोधले होते. त्यानंतर आलेल्या ब्रिटिशांनी हाच शब्द पुढे प्रचलित केला. भारतातील १२ अलवर आणि ६३ नयनमार यांनी देखील आपल्या लिखाणात हिंदू हा शब्द वापरलेला नाही. हिंदू हा शब्द मुघल किंवा इतर आक्रमणकारी लोकांनी दिलेला असावा. मात्र आपली सर्वांची ओळख आता भारतीय म्हणून झालेली आहे. बाहेरचा व्यक्ती येऊन आपल्याला ओळख देऊ शकत नाही, असेही कमल हासन म्हणाले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

कमल हासन यांनी काही दिवसांपूर्वी नथुराम गोडसेला हिंदू धर्मातील पहिला दहशतवादी असल्याचे सांगितले होते. या वक्तव्यावर देशभरातून टीका झाल्यानंतर कमल हासन यांनी सारवासारव करत प्रत्येक धर्मात अतिरेकी विचारधारेचे लोक असल्याचे सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -