घरताज्या घडामोडीLive Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार

Live Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.


नाशिकमधील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

- Advertisement -

कल्याणमधील पत्रीपुलाच्या कामासाठी सलग दुसऱ्या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे ऑवर ब्रिजवरतील गरडर बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या मेगाब्लॉकमुळे दुसऱ्या दिवशी देखील काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

 


कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंम्बाचिया यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.


देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार २०९ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून ५०१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ९० लाख ९५ हजार ८०७वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३३ हजार २२७ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून ८५ लाख २१ हजार ६१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


देशात २१ नोव्हेंबरपर्यंत १३ कोटी १७ लाख ३३ हजार १३४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १० लाख ७५ हजार ३२६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कायम आहे. त्याप्रमाणे जगातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ कोटी ८४ लाख ८८ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १३ लाख ८६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ४ कोटी ४ लाख ६४ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात कोरोनाची दुसरी लाट येतेय का? याची चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे राज्यातला रिकव्हरी रेट मात्र ९२.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात ४ हजार ०८८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या राज्यात १६ लाख ४७ हजार ४ वर पोहोचली आहे. मात्र, दुसरीकडे दिवसभरात ५ हजार ७६० नवे कोरोनाबाधित देखील सापडले आहेत. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -