Live Update: पुण्यात २४ तासात २ हजारांहून अधिकांना कोरोनाची बाधा

पुण्यात २४ तासात २ हजारांहून अधिकांना कोरोनाची बाधा झाली असून दिवसभरात ५८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. आतापर्यंत पुण्यात बाधितांचा आकडा हा ३ लाखांवर पोहोचला असून २ लाख ६१ हजार ५६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.


लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. त्यांचा मुलगा चिराग पासवान याने ट्विट करत आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. एनडीएमधील एक प्रमुख घटक पक्ष म्हणून लोजपची ओळख आहे. ७४ वर्षीय पासवान मागच्या महिन्याभरापासून उपचार घेत होते. चिराग पासवान यांनी आपल्या ट्विटमध्ये भावनिक संदेश देताना म्हटले की, “पप्पा, तुम्ही या जगात नाहीत. पण मला माहितीये तुम्ही जिथे असाल तिथून आमच्या सोबत आहात.” (सविस्तर वाचा)


मुंबईत आज २ हजार ८२३ नव्या रूग्णांना कोरोनाचा संसर्ग

मुंबईत आज कोरोनाचे २ हजार ८२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख २२ हजार ७६१ वर पोहचली आहे. तर ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार २९३ वर पोहचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज २ हजार ९३३ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ८६ हजार ६७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात दिवसभरात १५,५७५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात १३,३९५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४,९३,८८४ झाली आहे. राज्यात २,४१,९८६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३९,४३० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


दिल्लीत गेल्या २४ तासात २ हजार ७२६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ हजार ६४३ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत दिल्लीत एकूण ३ लाखांहून अधिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच एकूण ५ हजार ६१६ जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची माहिती दिल्ली सरकारने दिली आहे.


मुंबईतील धारावी भागात आज ८ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर धारावीतील बाधितांचा आकडा हा ३ हजार ३०० वर जाऊन पोहोचला आहे. सध्या धारावीत १८७ रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर २ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


कोरोनाच्या काळात २ लाख ७८ हजार ५१० गुन्हे नोंद झाले असून विविध गुन्ह्यांसाठी ३० कोटी १८ लाखांचा दंड वसूल आतापर्यंत पोलिसांनी केला आहे. तर ४० हजार १७२ जणांना अटक केली आहे. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर ९६ हजार ५४७ वाहने जप्त केली आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधित २५७ पोलीस वीरांचा मृत्यू मृत्यू झाला आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १९५ नवे कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २४ हजार ५८१वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २५७ पोलिसांचा मृत्यू झाला असून २१ हजार ८६२ पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तसेच २ हजार ४६२ पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २५ हजार कोटींच्या कथिक महाराष्ट्र राज्य सरकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ६९ जणांना क्लीन चीट दिली आहे. सत्र न्यायालयात मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.


देशात गेल्या २४ तासांत ७८ हजार ५२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९७१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६८ लाख ३५ हजार ६५६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५ हजार ५२६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५८ लाख २७ हजार ७०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ९ लाख २ हजार ४२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे.


देशात काल दिवसभरात ११ लाख ९४ हजार ३२१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. ७ ऑक्टोबरपर्यंत देशात ८ कोटी ३४ लाख ६५ हजार ९७५ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात ३ कोटी ६३ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ कोटी ७४ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान संपूर्ण जगात कोरोना सर्वात जास्त फटका अमेरिका, भारत आणि ब्राझीलला बसला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा ७७ लाख ७६ हजार २२४वर पोहोचला असून २ लाख १६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा ६८ लाख ३२ हजार ९८८वर पोहोचला असून १ लाख ५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ब्राझीलमधला कोरोनाबाधितांचा आकडा हा ५० लाख पार झाला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.


बुधवारी दिवसभरात राज्यात १४ हजार ७१५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ८० हजार ४८९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३९ हजार ०७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. तसेच बुधवारी १६,७१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण ११,९६,४४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०. ८१ % एवढे झाले आहे. सविस्तर वाचा