विवाहितेचा मृत्यू झाला असे समजून माहेरचे अस्वस्थ; पण सापडली प्रियकरासह!

विवाहित महिलेने घरातून रोकड आणि दागिने घेऊन पळ काढला.

प्रातिनिधीक फोटो

बिहारमधील कैमूर जिल्ह्यात एक विवाहित महिला बेपत्ता झाली. सासू-सासऱ्यांनी विवाहितेचा खुन केला असल्याचा आरोप लावून या मुलीच्या माहेरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावेळी सासरच्यांनी विवाहित महिलेवर दागिने घेऊन घरातून पळ काढल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केली असता त्यानंतर पोलिसांनी यूपीच्या चांदौली येथून महिलेला जिवंत शोधून काढले. ही विवाहित महिला तिच्या प्रियकरासह राहत होती.

असा घडला प्रकार

कैमूर जिल्ह्यातील चांदौली पोलिस स्टेशन परिसरातील सिरहीरा गावात १९ ऑक्टोबर रोजी ही महिला अचानक घरातून बेपत्ता झाली. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या विवाहित महिलेच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, तिचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. सासरच्यांनी तिला ठार मारून तिची हत्या केली.

दरम्यान पोलिसांनी सासरच्यांची चौकशी केली असता त्यांनी एक वेगळीच कहाणी सांगितली. त्यांनी असे सांगितले की, या महिलेने घरातून रोकड आणि दागिने घेऊन पळ काढला. पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील तक्रारींच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी यूपीच्या चांदौली जिल्ह्यातील महिलेला ताब्यात घेतले असून ती तेथेच आपल्या प्रियकराबरोबर राहत होती. बनावट सिम ही महिला वापरत असून पोलिसांनी या महिलेकडून दीड लाख रुपयांची रोकड तसेच सोन्या चांदीचे दागिनेही जप्त केले आहेत.

तर महिलेने सांगितले की, नवऱ्याने तिला मारहाण केली, या मारहाणीला कंटाळून तिने घराबाहेर पळ काढण्याची योजना आखली. यानंतर ती आपल्या प्रियकरासह घराबाहेर पळून चंदौली येथे आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती महिला आपल्या प्रियकराबरोबर चंदौली जिल्ह्यातील प्रल्हादपूर या गावी राहत होती. पोलिसांनी तिच्या प्रियकरासह महिलेलाही ताब्यात घेतले आहे. दोघांनाही कोर्टात हजर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.


Pfizer कंपनीचा दावा; ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी Corona लस