घरदेश-विदेशकर्नाटक राजकीय नाट्य; आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील गायब

कर्नाटक राजकीय नाट्य; आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील गायब

Subscribe

कर्नाटकच्या राजकीय नाट्याला काही केल्या पूर्णविराम लागताना दिसत नाही. त्यात आणखीन भर म्हणजे कर्नाटकचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील अचानक गायब झाले आहेत.

कर्नाटकचे काँग्रेस आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील बुधवार रात्रीपासून अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या राजकीय घडामोडींना वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आज कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींना विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. परंतु, श्रीमंत पाटलांचे अशाप्रकारे गायब होणे म्हणजे धक्कादायक आहे. पाटील यांचा फोनही बंद येत आहे. त्यामुळे त्यांच्याशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही.

शोधण्यासाठी काँग्रेसने आखल्या दहा टीम

कर्नाटकमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला काही केल्या पूर्णविराम लागताना दिसन नाही. त्यात आणखीन भर म्हणजे या प्रकरणाशी संबंधित रोज नव्या बातम्या समोर येत आहेत. कधी बंडखोर आमदार मुंबईत येतात, तर कधी दिल्लीला रवाना होता, कधी ते पुन्हा कर्नाटकात जातात तर कधी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकतात. मुंबईत आल्यावर या आमदारांना कांग्रेसच्या नेत्यांकडून भीती वाटते म्हणून ते मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवतात. आता या सर्वांच्या पलीकडे एक बातमी समोर आली आहे की, काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील अचानक गायब झाले आहेत. श्रीमंत बाळासाहेब पाटील म्हणजे मोठी हस्ती. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी काँग्रेसने चक्क दहा वेगवेगळ्या टीम आखल्या आहेत. या टीम त्यांचा शोध घेत आहेत. बुधवारी रात्री ते रिसॉर्टमध्ये दिसले होते. त्यानंतर ते कुठे गेले? याचा पत्ताच नाही. काँग्रेसच्या टीमने त्यांना विमानतळावरही भरपूर शोधले. मात्र त्यांचा तपास लागला नाही.

- Advertisement -

विश्वावासाच्या ठराव्यात बंडखोर आमदारांचा सहभाग नाहीच

काँग्रेस आणि जेडीएसच्या १४ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप आला. सुरूवातीला कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी फक्त ४ ते ५ आमदारांचे राजीनामे नियमांनुसार दिल्याचे सांगत इतर आमदारांचा राजीनामा स्वीकारला नाही. त्यामुळे बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सुनावणीत आमदारांना दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सुनावणीनुसार विधानसभेत विश्वासाचा ठरावावर चर्चा होत असताना बंडखोर आमदार अनुपस्थित राहिले तरी चालणार आहे.


हेही वाचा – कर्नाटकातील ‘त्या’ बंडखोर आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा – सुप्रीम कोर्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -