घरदेश-विदेशहरवली तेव्हा होती मुलगी पण सापडला मुलगा!

हरवली तेव्हा होती मुलगी पण सापडला मुलगा!

Subscribe

या मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले होते. यामुळे तिची आई दरवर्षी आपल्या मृत मुलीचा जन्म दिवस साजरा करत होता. मात्र या आईला एका मेलमुळे तिची मृत मुलगी सापडली आहे. पण ती नव्या रुपात.

एखाद्या आईने मुलं गमावणे ही सर्वात मोठी वेदना देणारी गोष्टी आहे. ही वेदना फक्त आईलाचं समजू शकते. कारण ती ९ महिने आपल्या बाळाला ती पोटात वाढवतं असते. अशाचं एका आईसोबत आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे. ही आई आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचं समजंत होती. मात्र तिला तब्बल ३० वर्षानंतर आपली मुलगी जिवंत आढळली आहे. कॅलिफोर्निया मधील टीना बेजार्नो या आईने १७ वर्षांची असताना एका मुलीला जन्म दिला. पण दुसऱ्याचं दिवशी मुलगी जन्म देताचं तिचा मृत्यू झाल्याचं टीनाला सांगण्यात आलं.

तरी देखील टीना ही दरवर्षी आपल्या मृत मुलीचा जन्म दिवस साजरा करायची. त्यानंतर टीना इरिका गार्डे नावाच्या माणसाला टेड करायला लागली. ३० वर्षांनंतर टीनाला अचानक एक ईमेल आला. हा ईमेल तिला न्यू जर्सीच्या एका व्यक्तीने पाठवला होता आणि या व्यक्तीने असा दावा केला की टीना त्याची आई आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तिने SOS मेसेज जमिनीवर कोरला, अक्कल हुशारीने जीव वाचला!

मेल ऑनलाइननुसार, टीना आणि तिच्या मुलीचा डीएनए डाटाबेस कंपनीला दिला होता जिथे हा डीएनए जुळला. डीएनए जुळल्यानंतर टीनाला त्या व्यक्तीने त्वरित ईमेल केला आणि म्हणाला की, ‘आपल्याला बोलण्याची खूप आवश्यकता आहे. आपला एकमेकांशी जवळचा संबंध आहे आणि तुम्ही माझ्या आई आहात’, असं टीनाला सांगितलं.

- Advertisement -

डीएनए चाचणीने हे सिद्ध केलं की, टीनाच्या बाळाचा मृत्यू झाला नव्हता. आता टीना बाळं ही मुलगी नसून मुलगा आहे. टीनाच्या मुलीने सर्जरी करून मुलग्याचे जीवन जगतं आहे. आता टीनाच्या मुलाचं लग्न झालं असून त्याला मुलं देखील आहेत. तो सध्या २९ वर्षांचा आहे. टीना म्हणते की, तिचं मुलं स्त्री असो वा पुरुष याचा तिला फरक पडतं नाही. फक्त तिला एवढंच माहित आहे की हे तिचंच मुलं आहे.


हेही वाचाअमेरिकेत अवैधरित्या जाणाऱ्या ३११ भारतीयांची पुन्हा मायदेशी रवानगी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -