अरे बापरे! ‘या’ दोन अंड्याचे बिल सतराशे रुपये

मुंबईच्या एका पंचताराकिंत हॉटेलने दोन उकडलेल्या अंड्यांचे बिल तब्बल १ हजार ७०० रुपये लावले असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mumbai
Mumbai five star hotel four eggs charge three thousand four hundred rupees
दोन अंड्याचे बिल सतराशे रुपये

काही दिवसांपूर्वी चंदीगडमधील एका तारांकित हॉटेलमध्ये दोन केळ्यांचे बिल ४४२ रुपये लावल्याचा धक्कादायक प्रकार अभिनेता राहुल बोसला यांनी समोर आणला होता. आता चंदीगड पाठोपाठ मुंबईत देखील असा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आता मुंबईच्या एका पंचताराकिंत हॉटेलने दोन उकडलेल्या अंड्यांचे बिल तब्बल १ हजार ७०० रुपये लावले आहे. एका ट्विटर युझरने त्याचे बिल ट्विटरवर पोस्ट केले आहे. त्यात दोन अंड्यांचे बिल १७०० आणि ऑम्लेटचे ८५० रुपये बिल लावले आहे.

चला आंदोलन करायचे का?

मुंबईतील फोर सीझन हॉटेल या पंचताराकिंत हॉटेलमधून एका कार्तिक धर या तरुणाने दोन उकडलेली अंडी, दोन ऑम्लेट आणि डाएट कोकसह काही अन्नपदार्थ मागवले होते. या हॉटेलने एका ऑम्लेटचे ८५० रुपयाप्रमाणे दोन उकडलेल्या अंड्यांचे तब्बल १ हजार ७०० रुपये बिल लावले आहे. म्हणजे चार अंड्यांचे मिळून ३ हजार ४०० रुपये लावले आहेत. बिल आल्यानंतर कार्तिकला धक्काच बसला त्यांनी सर्व अन्नपदार्थाच्या किंमती पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांने आपल्या बिलाचा फोटो काढून ट्विटरवर शेअर करुन अभिनेता राहुल बोसला टॅग केले आहे आणि आंदोलन करायचे का? असा प्रश्न देखील विचारला आहे.


हेही वाचा – तुरुंगातून पळण्यासाठी त्याने केला स्वत:च्याच मुलीचा वेष! ओळखणंही कठीण!