मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचण्यात आला; पाकिस्तानची कबुली

pakistan mumbai terror attack 2008 planning in pakistan

मुंबईवर झालेल्या २००८ च्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. मुंबईवर २००८ मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याची योजना पाकिस्तानमध्ये आखण्यात आली, अशी मोठी कबुली पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली आहे. त्यात २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याशी थेट संबंध असणाऱ्या १९ दहशतवाद्यांचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने देशातील अतिरेक्यांची यादी जाहीर केली असून त्यापैकी मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित १९ नावे आहेत. लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांची नावे देण्यात आली आहेत, या यादीमध्ये इफ्तीकर अली, मोहम्मद अमजद खान, मोहम्मद उस्मान, अब्दुल रहमान आणि इतर दहशतवाद्यांचा समावेश आहेत. यासह पाकिस्तानने कबूल केले आहे की, पाकिस्तानमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याचे नियोजन केले गेले होते आणि पाकिस्तानकडूनच त्यांना वित्त पुरवठा करण्यात आला होता. पाकिस्तानने जाहीर केलेल्या या यादीमध्ये दहशतवाद्यांसाठी मोटार बोट, लाइफ जॅकेट्स आणि इतर वस्तू विकत घेतलेल्या आणि कराचीहून मुंबईत येण्याची व्यवस्था करणार्‍या लोकांची नावे आहेत.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत समुद्रमार्गे आलेल्या अतिरेक्यांनी हल्ला केला होता, यावेळी दहशतवाद्यांनी रेल्वे स्थानक, ताज हॉटेल आणि इतर काही ठिकाणी हल्ले केले होते. या दहशतवादी हल्ल्यात १६० हून अधिक लोकांचा मृत्य झाला. तीन दिवस आतंकवाद्यांशी लढा सुरु होता. मुंबई पोलिसांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडले होते.