धक्कादायक! १९ वर्षाच्या मुलाला घरातून बोलावले; चाकू भोसकून केली हत्या

एकाच आठवड्यातील ही दूसरी घटना

Crime-Murder
Advertisement

दिल्लीतील वेलकम परिसरातील जनता मजदूर कॉलनीत अमन नावाच्या १९ वर्षाच्या मुलाला चाकू भोसकून ठार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. या भागात अवघ्या एका आठवड्यात चाकूने दुसरा खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठविला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

असा घडला प्रकार

उत्तर पूर्व दिल्लीच्या वेलकम परिसरातील जनता मजदूर कॉलनीतील एका आठवड्यातील ही दूसरी घटना आहे. असे सांगितले जात आहे की, मृत पावलेला अमन घरी जेवण करत होता. त्याला दोन मुलांनी बोलावले. त्यानंतर काही वेळाने शेजारच्यांनी अमनच्या घरच्यांना असे सांगितले की, त्याचा मुलगा रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी उशीर न करता त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमन चप्पल तयार करायचा. या हत्येमुळे स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. लोकांचा असा आरोप आहे की, लोकांच्या मनात पोलिसांची भीती संपली आहे. तोंडावर मास्क लावले नाही की, पोलिस त्वरीत कारवाई करतात. परंतु कोणत्याही मोठ्या घटना घडल्यावर पोलीस त्वरीत कारवाई करत नाही.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी जीटीबी रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल. पोलिस या हत्येमागील परस्पर शत्रुत्वाबद्दल सांगत आहेत. परंतु तपासणीनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.


आश्रमात साध्वीवर सामूहिक बलात्कार; आरोपींनी बंदुकीच्या जोरावर साधूंना ठेवलं ओलीस