घरदेश-विदेशज्या गुफेत मोदींनी ध्यान केले होते 'ती' गुफा; ऑक्टोबरपर्यंत हाऊसफुल!

ज्या गुफेत मोदींनी ध्यान केले होते ‘ती’ गुफा; ऑक्टोबरपर्यंत हाऊसफुल!

Subscribe

निवडणुकी दरम्यान पंतप्रधान मोदींनी केले होते या गुफेत ध्यान

मागील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथ येथील काही मंदिरांचे दर्शन घेतले होते. यावेळी केदारनाथ येथील एका गुफेत ध्यान देखील केले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी केलेले हे ध्यान आणि त्याची बातमी जगाच्या प्रत्येकापर्यंत पोहचली होती. नरेंद्र मोदींच्या ध्यानासोबत ती गुफा देखील आता सर्वत्र चर्चेत आली होती.

केदारनाथमधील ही गुफा विशेष पर्यटन स्थळ

एवढी या गुफेची चर्चे झाली की, आता ही गुफा ध्यानाकरिता ऑक्टोबर पर्यंत हाऊसफुल झाली आहे. ऑक्टोबर २०१९ पर्यंत सगळीच बुकींग झाली आहे. याचाच अर्थ केदारनाथमधील ही गुफा आता विशेष पर्यटन स्थळ बनले आहे. मुख्य केदारनाथ मंदिरापासून साधारण १ किलोमीटर अंतरावर आहे. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापुर्वी (१८ मे) केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले होते. त्यावेळी रात्रभऱ त्याच गुहेत ध्यानधारणा केल्याने ही गुफा चर्चेचा विषय ठरली होती.

- Advertisement -

ऑक्टोबरपर्यंत गुफेचे बुकींग फुल

मोदींनी केलेल्या ध्यानधारणेनंतर या गुहेत जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागच्या ६५ दिवसांत या ठिकाणी ४६ भाविकांनी ध्यान केले होते, तर ऑक्टोबरपर्यंत या गुहेत ध्यान करणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होणार असून भाविकांनी तसे बुकींग देखील केले आहे.

- Advertisement -

असे आहेत शुल्क

गढवाल मंडल विकास निगमने दिलेल्य़ा माहितीनुसार, या गुफेच्य़ा माध्यमातून ९५ हजार रूपयांचा महसूल जमा झाला आहे. या गुफेत ध्यान करण्याकरिता भाविकांना प्रतिरात्र १५०० रूपये तर प्रतिदिन ९९० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -