घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेलची शंभरीकडे वाटचाल

पेट्रोल-डिझेलची शंभरीकडे वाटचाल

Subscribe

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे. दोन दिवसापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दराने नव्वदी ओलांडली आता त्याची शंभरीकडे वाटचाल सुरु झाली आहे. दरवाढीमुळे जनता अधिक त्रस्त झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये गेल्या २९ दिवसापासून वाढ सुरुच आहे. एक महिना होत आला तरी देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हायचे नाव घेत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर उसंडी मारत चालले आहेत. याचा सर्व सामान्य जनतेला सर्वात जास्त फटका बसत आहे. पेट्रोल डिझेलच्या दराने नव्वदी ओलांडून आता शंभरीकडे वाचलाच सुरु केली आहे. आज पुन्हा ही दरवाढ झाल्यामुळे मुंबईत पेट्रोलमध्ये १४ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ९०.२२ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. तर डिझेलच्या दरात ११ पैशांनी वाढ झाल्याने डिझेल ७८.६९ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. महिना होत आला ही दरवाढ सुरु आहे यावर सरकार काहीच करत नसल्याने जनता नाराज झाली आहे.

- Advertisement -

राजधानीतही पेट्रोल-डिझेलच्या दर वाढले

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा पार केला तर दिल्लीत ही तिच परिस्थिती पहायला मिळत आहे. दर वाढीचे सत्र असेच चालत राहिले आहे. राजधानीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये १४ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ८२.८६ रुपये प्रतीलिटर तर डिझेलच्या दरामध्ये ११ पैशांनी वाढ झाल्यामुळे पेट्रोल ७४.१२ रुपये प्रतीलिटर दराने मिळत आहे. इंधनाच्या दरामध्ये होणाऱ्या वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. या दर वाढीमुळे इतर वस्तूंच्या किंमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या खिशाला आणखी फटका बसत आहे. या दरवाढीतून सुटका कधी होणार असा सवाल जनतेकडून केला जात आहे.

कच्च्या तेलाचे भाव वाढण्याची शक्यता

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. तर मुंबई, पुण्यासह ३४ जिल्ह्यामध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाचे भाव १०० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया दिवसेंदिवस घसरत चालल्याने तसेच अमेरिकेचे इराणशी संबंध बिघडल्यामुळे त्याचा परिणाम तेलाच्या किंमतींवर होत आहे.

संबंधित बातम्या – 

ॐ पेट्रोलाय नमः। ॐ डिझेलाय नमः। ॐ डॉलराय नमः!
पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र २८ व्या दिवशी सुरुच
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -