घरदेश-विदेशव्हिडीओतील तिच्या जखमा पाहून ट्विटर युजर्स हळहळले

व्हिडीओतील तिच्या जखमा पाहून ट्विटर युजर्स हळहळले

Subscribe

घरगुती हिंसाचाराची बळी ठरलेल्या एका महिलेचा व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला असून या व्हिडीओवर ट्वीटर वापरकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

२१व्या शतकातही महिला घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत. हेच दर्शवणारा एक व्हिडीओ सध्या ट्विटर या सोशल माध्यमावर व्हायरल झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारा असा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओखाली या महिलेने घरगुती हिंसाचाराविरुद्ध जनजागृतीसाठी ही क्लिप प्रभावी ठरेल असे म्हटले आहे.

हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ

या महिलेने शेअर केलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला घरगुती अत्याचार सुरू होण्यापूर्वी पुष्पगुच्छांचा स्विकार करत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हास्य आपण पाहतो. पण लग्नानंतर मात्र परिस्थिती बदललेली दिसते. लग्न टिकून रहावे यासाठी या महिलेला अत्याचारातून झालेल्या जखमा मेकअपच्या सहाय्याने लपवाव्या लागत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. व्हिडोओचा शेवट हृदय पिळवटून टाकतो. यामध्ये अत्याचारामुळे महिला खूप जखमी झाल्याचे दिसते. या शेवटच्या भागात रडत चेहऱ्याने ती दयेची भीक मागत असल्याचे दिसते.

- Advertisement -

Video: ‘मला कोणाचा बाप सुद्धा अडवू शकत नाही’

घरगुती हिंसाचाराला समाज जबाबदार – ट्विटर वापरकर्ते

ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरच्या वापरकर्त्यांनी घरगुती हिंसाचाराविरोधात आवाज उठविला आहे. अनेकांनी घरगुती हिंसाचाराच्या घटनांसाठी समाजाला दोष दिला आहे. समाजामुळेच पटत नसतानासुद्धा लग्न टिकवावे लागत असल्याचे म्हणणे मांडले आहे.

- Advertisement -

एका ट्विटर वापरकर्त्याने ट्विट केले की, ”मला कळत नाही महिलांवर पुरुषत्व गाजवण्यासाठी त्यांना मारण्याचा पर्याय निवडणाऱ्या पुरुषांबाबत काय बोलावे?” तर दुसऱ्या ट्विटर वापरकर्त्याने ट्विट केले की,”हा व्हिडीओमधील महिलेच्या धाडसाला सलाम. हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल आम्ही तिचे आभार मानतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -