घरदेश-विदेशजवान करणार 'हवाई मार्गा'ने प्रवास; केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

जवान करणार ‘हवाई मार्गा’ने प्रवास; केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

Subscribe

जम्मू काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने निमलष्करी दलाच्या जवान दिलासा दिला आहे. आता निमलष्करी जवान हवाई मार्गानं प्रवास करु शकणार आहेत.

जम्मू काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण असा मोठा निर्णय घेतला आहे. श्रीनगरहून येण्या – जाण्यासाठी निमलष्करी दलाचे जवान आता हवाई मार्गाचा वापर करु शकतात. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, दिल्ली ते श्रीनगर, श्रीनगर ते दिल्ली आणि श्रीनगर ते जम्मू या दरम्यान निमलष्करी दलाचे जवान हवाई मार्गानं प्रवास करु शकतात. केंद्रीय सशसत्र निमलष्करी दलाच्या जवानांसाठीही हा आदेश लागू असणार आहे. त्यामुळे निमलष्करी दलाला मोठा दिलासा मिळाला आहे.

याचा फायदा ८ लाख निमलष्करी जवानांना होणार

गृह मंत्रालयाच्या आदेशाचा फायदा निमलष्करी दलाच्या ७ लाख ८० हजार जवानांना होणर आहे. यामध्ये कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, एएसआईपासून सर्व कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. आतापर्यंत निमलष्करी दलाच्या जवानांना हवाई मार्गानं प्रवास करता येत नव्हता. पुलवामात जो भ्याड हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात एकाच वेळी ४० हून अधिक जवान शहीद झाले आहेत. तसेच एकाचवेळी अडीच हजार पेक्षा अधिक जवान प्रवास करीत होते. इतके जवान एकाचवेळी का प्रवास करत होते? असा प्रश्न या हल्ल्यानंतर उपस्थित झाला. या जवानांना हवाई मार्गानं श्रीनगरला पाठवण्यात आलं असतं, तर हा हल्ला टाळता आला असता, अशी चर्चा देखील झाली. त्यामुळे आता सरकारनं निमलष्करी दलाच्या जवानांना हवाई मार्गानं प्रवास करण्याचे अधिकार दिले आहेत.

- Advertisement -

पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा भ्याड हल्ला केला होता. एकाचवेळी अडीच हजार जवान रस्त्यावरुन प्रवास करणार हा त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा होता. त्यामुळे त्यांना हवाई मार्गानं नेण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र गृह मंत्रालयानं ती दिली नाही, असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होत. मात्र हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्टीकरण गृह मंत्रालयानं दिलं होतं.


हेही वाचा – ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ बोला आणि डिस्काऊंट मिळवा!

- Advertisement -

हेही वाचा – भीक मागून केलेली कमाई दिली शहीदांना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -