घरदेश-विदेशगांधी जयंतीला मांसाहार मिळणारच!

गांधी जयंतीला मांसाहार मिळणारच!

Subscribe

गांधी जयंती दिनी रेल्वेमध्ये किंवा स्टेशन परिसरात मांसाहारी जेवण ठेवले जावू नये, असा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने मांडला होता. रेल्वे प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसासाठी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठविला होते. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने हा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे गांधी जयंती दिनी देखील रेल्वेमध्ये मांसाहारी जेवण मिळणार आहे.

देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची येत्या दोन ऑक्टोबरला १५०वी जयंती आहे. ही जयंती मोठ्या थाटात आणि अविस्मरणीय अशी साजरी करण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे. या जयंती महोत्सवात रेल्वे प्रशासनानेही आपला सहभाग नोंदवत एक अहवाल बनविला आहे. त्या अहवालात गांधी जयंती दिवशी रेल्वेत किंवा स्टेशन परिसरात कुठल्याही प्रकारचे मांसाहारी जेवण मिळणार नाही, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा अहवाल मंजुरीसाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

- Advertisement -

मांसाहारी जेवण का नको?
गांधीजी अहिंसेचे पुजारी होते. ते शाकाहारी होते. त्यांना मांसाहारी जेवणाचा तिटकारा होता. शाकाहारी होऊन हिंसा टाळता येते, अशी त्यांची धारणा होती. या साऱ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने जयंतीच्या दिवशी मांसाहारी जेवण देण्यात येऊ नये, असे अहवालात म्हटले आहे.

शाकाहारी दिवस
आतापर्यंत गांधी जयंतीसोबतच स्वच्छता दिवसही साजरा करत होते. त्याचबरोबर हा दिवस शाकाहारी दिवस म्हणून ही साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने मांडला आहे.

- Advertisement -

तीन वर्ष नसणार मांसाहारी जेवण
रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावामध्ये २०१८, २०१९ आणि २०२० या तीन वर्षी गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी मांसाहार न देण्याचे नमूद करण्यात आले आहे.

जयंतीसाठी राष्ट्रपतींनी नेमली समिती
गांधीजींच्या जयंतीनिमित्ताने देशाचे राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी एक समिती नेमली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच समितीची बैठक झाली.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -